शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भितीने परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांची होतेय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आपत्तीव्यवस्थापन २००५ च्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली असून यांतर्गत विदेशातून परत येणाºया जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आपत्तीव्यवस्थापन २००५ च्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली असून यांतर्गत विदेशातून परत येणाºया जिल्ह्यातील रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे़ यात आतापर्यंत सात जणांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे़जिल्हा रुग्णालयात यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या दोघांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला होता़ परंतू यानंतर दक्षता म्हणून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे़ त्यांच्यावर वैद्यकीय पथक नजर ठेवून असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान कोरोनाच्या भितीने जिल्ह्यात चिंता निर्माण झाली आहे़ आरोग्य विभागाकडून या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय आणि ११ ग्रामीण रुग्णालयात कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाºया डॉक्टर्सला प्रशिक्षित करण्यासाठी दोन दिवस शिबिरे घेण्यात येणार आहे़कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय प्रशासन यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची कडक अंमलबजावणी सुरू आहे़ यांतर्गत शुक्रवारी दुपारी प्रशासनाकडून जिल्ह्यातून परदेशात गेलेले आणि परत येणाºया रहिवाशांची माहिती गोळा करणे सुरु करण्यात आले होते़ यातून पूर्वीचे तिघे आणि नव्याने चार असे एकूण सात जण विदेशातून परत आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती़ यातील दोघे नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील तर दोघे हे नंदुरबार शहरातील असल्याची माहिती आहे़ दोघे धार्मिक कारणासाठी तर दोघे पर्यटनासाठी परदेशात जावून परत आले आहेत़ त्यांना जिल्हा रुग्णालयात बोलावून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनातील पथकांनी तपासण्या करुन सर्व काही सुरळीत असल्याचे पाहून घरी जाण्याचे सांगितले होते़ परंतू १४ दिवस घराबाहेर पडू नये असा इशारा देत घरात बंदिस्त राहण्याच्या सूचना केल्या आहेत़ याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी विदेशातून आलेल्या सातही प्रवाशांची चौकशी करुन त्यांना घरीच थांबवण्याच्या सूचना दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे़जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतर सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सोबतच जिल्हा पोलिस विभाग आणि गृहविभाग यांना विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती मिळवण्यासह शहरातील विविध हॉटेल व लॉज मालकांना परदेशातून येणाºया नागरिकांची माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे़ आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर नजर ठेवून अफवा पसरवणाऱ्यांवर आणि चुकीची माहिती देऊन समाजात गैरसमज निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ यानुसार सायबर सेलकडून सोशल मिडियावर नजर ठेवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़