शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भांडणाात मध्यस्थी, सासूला जाळण्याचा जावयाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 6:51 AM

पती-पत्नीच्या भांडणात सासू नेहमीच मध्यस्थी करून भांडण सोडविते. याचा राग येऊन जावयाने सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबारातील साक्रीनाका भागात घडली. घटनेत सासूबाई या गंभीर जळाल्या आहेत.

नंदुरबार : पती-पत्नीच्या भांडणात सासू नेहमीच मध्यस्थी करून भांडण सोडविते. याचा राग येऊन जावयाने सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबारातील साक्रीनाका भागात घडली. घटनेत सासूबाई या गंभीर जळाल्या आहेत.पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील साक्रीनाका भागात राहणाऱ्या कमलाबाई अशोक चौधरी यांच्याकडे त्यांची मुलगी व जावई दीपक चौधरी राहतात. दोघा पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. त्यात मध्यस्थी म्हणून सासूबाई कमलाबाई चौधरी राहत होत्या. त्याचा राग दीपक चौधरी यांना येत असे. त्या रागातूनच सासूचा काटा काढण्याचा बेत त्याने रचला. २४ रोजी दुपारी त्याने घरात सासू कमलाबाई चौधरी यांना कपाटातून आधारकार्ड काढण्याचे सांगितले. त्या आधारकार्ड काढण्यासाठी खाली बसल्याची संधी साधत त्याने शिवीगाळ करीत कमलाबाई यांचा गळा दाबला, दुसºया हातातील पेट्रोलची कॅन त्याच्या अंगावर ओतून जाळले. त्यात कमलाबाई चौधरी या गंभीर भाजल्या. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.याबाबत कमलाबाई अशोक चौधरी यांनी फिर्याद दिल्याने दीपक चौधरी यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक के.जी. पवार व पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाटील करीत आहेत.