नंदुरबार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:40+5:302021-06-23T04:20:40+5:30

या वेबिनारसाठी वक्ता म्हणून प्रमाणित योग प्रशिक्षक नेहा शर्मा होत्या. त्यांनी विविध योग आसन आणि प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले. ...

International Yoga Day celebrated at Nandurbar Law College | नंदुरबार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

नंदुरबार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

या वेबिनारसाठी वक्ता म्हणून प्रमाणित योग प्रशिक्षक नेहा शर्मा होत्या. त्यांनी विविध योग आसन आणि प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले. निरोगी आरोग्यमय जीवन जगण्यासाठी योग व प्राणायाम यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. कोविड-१९ या महामारीच्या काळात ज्या व्यक्तींनी नियमित योगा व प्राणायाम केले, ते या महामारीतून लवकर बरे झाल्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील मान्य केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात प्लेक्स वेलनेसचे संस्थापक नितीन देसाई यांनी केली.

विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एस. हासाणी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र रघुवंशी, सचिव यशवंत पाटील व सर्व संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले.

Web Title: International Yoga Day celebrated at Nandurbar Law College