शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जलस्त्रोतांची मोबाईल अॅपद्वारे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साडेआठ हजार सार्वजनिक जलस्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आह़े यासाठी प्रथमच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साडेआठ हजार सार्वजनिक जलस्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आह़े यासाठी प्रथमच जिओफेंन्सिंग मोबाईल अॅपची मदत घेण्यात येणार असून याद्वारेच तपासणीच्या माहितीचे आदानप्रदान होणार आह़े         जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यांतर्गत जिल्ह्यातील 8 हजार 644 जलस्त्रोतांची तपासणी होणार आह़े मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण व पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सव्रेक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आह़े यातून जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध आणि निजरुकीकरण केलेले पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर जलनमुने तपासणीसाठी पाठवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येतो़ यांतर्गत यंदा जिओफेन्सिंग मोबाईल अॅपद्वारे ही तपासणी होणार आह़े यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसुरक्षक, उपविभागीय जल कर्मचारी यांच्यासह विविध कर्मचा:यांना तपासणीसाठी पाठवण्यात येणा:या नमुन्यांची माहिती अॅपद्वारे पाठवायची आह़े 15 ऑक्टोबरपासून या मोहिमेला सुरुवात होणार असून 31 डिसेंबर रोजी अभियानाचा समारोप करण्यात येणार आह़े संकलित केलेल्या जलनमुन्यांची तपासणी अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार आणि नवापुर येथील तालुका प्रयोगशाळेत तर तळोदा व शहाद्याच्या नमुन्यांची तपासणी तळोद्यात होणार आह़े 

सुरु होणा:या अभियानासोबतच सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सव्रेक्षण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबवले जात आह़े त्यासाठीचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तराव स्त्रोतांचा परिसर, जलकुंभाची स्वच्छता, योजनांमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन त्याआधारे जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे काडे देण्यात येणार आह़े जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून एकूण 8 हजार 623 जलस्त्रोतांचे नमुने पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आह़े