शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकांकडून सॅनेटायझर्सची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने शहादा येथे शहरातील विविध मेडिकल स्टोअर्समध्ये भेटी देत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने शहादा येथे शहरातील विविध मेडिकल स्टोअर्समध्ये भेटी देत सॅनेटायझर आणि मास्क यांची तपासणी केली़ या तपासणी दरम्यान सर्वच वस्तू ह्या प्रमाणित व परवानाप्राप्त असल्याचा निर्वाळा पथकाकडून देण्यात आला़ शनिवारी दिवसभर हे पथक शहरातील विविध भागात तपासणी करत होते़कोरोनाच्या भितीमुळे सर्वच ठिकाणी मास्क आणि हात धुण्यासाठी सॅनेटायझर यांचा वापर वाढला आहे़ या अनुषंगाने मास्क व सेनीटायझरची वाढीव दरात विक्रीसह बोगस वस्तूंची बाजारात विक्री होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आपत्तीव्यवस्थापन कायद्यानुसार नंदुरबारचे वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक अनिल भाईदासगिर गोसावी व तळोदा विभाग निरीक्षक विनोद दिंडे यांच्या पथकाने शहादा शहरातील दुकानांची झडती घेत पासणी केली़ झडती दरम्यान एकाही ठिकाणी संशयास्पद किंवा अवैधरित्या मास्क किंवा सॅनेटायझर्सची विक्री आढळून आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे़ तपासणीनंतर भरारी पथकांकडून शहादा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या़ कुठल्याही रिटेल मेडिकल दुकानावर अवैधरित्या सॅनेटायझर किंवा मास्कची विक्री होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले संबंधित वस्तूंच्या खरेदी व विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड जपून देण्याच्या सूचना करण्यात आल्या़ शहादा शहरात अवैधपणे मास्क व सॅनेटायझरची विक्री झाल्यास जिल्हाधिकारी यांना संपर्क करण्याची माहिती भरारी पथकांकडून देण्यात आली़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे़ तसेच स्वच्छता करण्यात येऊन रुग्णालय सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ़ निलेश वसावे यांच्याकडून देण्यात आली आहे़याबाबत शहादा पालिका मुख्याधिकारी डॉ़ राहुल वाघ यांना संपर्क केला असता, त्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत आहे़ पालिकेकडून जनजागृती सुरु असून जास्त गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता करण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे़ शहरात तूर्तास जनजीवन सुरळीत असून शहरात कोरोना संशयित अद्याप आढळून आलेला नसल्याची माहिती दिली़ दरम्यान शहादा शहरात कोरोनाबाबत चर्चा वाढत आहेत़ तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण हे परदेशात तसेच पुणे,मुंबई आणि देशातील इतर ठिकाणी वास्तव्य करत आहेत़ कोरोनाचा प्रसार वाढत असताना त्यांचे येथे राहणारे कुटूंबिय त्यांची काळजी करत आहेत़ यातून दिवसभरात वेळ मिळेल तसा संवाद साधून माहिती घेतली जात असल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली़ तूर्तास परदेशातून कोणीही येण्याची माहिती मात्र मिळालेली नाही़ येत्या काळात शहादा तालुक्यात ठिकठिकाणी विवाह सोहळे आहेत़ त्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांनाही कोरोनाची भिती सतावत असल्याची माहिती देण्यात आली़संघटनेकडून कारवाई होणारभरारी पथकांच्या तपासणीनंतर शहादा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष छाजेड यांनी सर्व विक्रेत्यांची बैठक घेत सूचना केल्या़ यात कोणीही बिलाविना खरेदी-विक्री करू नये अन्यथा संघटनात्मक व प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ दरम्यान जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र डागा यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना करण्यात येत आहे़ सॅनेटायझर किंवा मास्कची विक्री करताना काळजी घेण्याचे सांगण्यात येत आहे़ जास्त दराने विक्री होणार नाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत़ तसे आढळल्यास संघटनेकडून संबधितावर कारवाई करण्यात येणार आहे़