शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात शिक्षणासाठी अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन लर्निंगची कास धरत कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न ...

तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन लर्निंगची कास धरत कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता सर्वच ठिकाणी ऑनलाईन लर्निंग ही संकल्पना वास्तव्यात उतरविणे शक्य झाले नसले तरी अनेक ठिकाणी ऑफलाईन स्टडी फ्रॉम होमची संकल्पना राबवून विद्यार्थ्यांपर्यत शिक्षण पोहचविले व अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जास्त काळ खंडित राहू दिली नाही.

डिजिटल शिक्षणाचा रथ

प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे रवींद्र पाटील व प्रियांका पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेत स्वतःच्या कारमध्ये त्यांनी एलसीडी टीव्ही, इन्व्हर्टर, माईक अशी उपकरणे बसवून विद्यार्थ्यांच्या दारात, गल्लोगल्ली जाऊन मुलींना एकत्र करून कोरोना नियमांचे पालन करून अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास हा उपक्रम या शिक्षकांनी सहा महिने राबवला. ‘ऑनलाईन शिक्षणाचा रथ’ म्हणून त्यांच्या या गाडीची पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली.

स्पीकरवर अभ्यासाचे धडे

धवलीविहीर येथील शिक्षकाने कोरोना काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी चौकाचौकात स्पीकर लावून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले. विविध समूहगीत, प्रार्थना, पाढे व इतर शैक्षणिक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून शाळेच्या शिक्षकानी त्या स्पीकरवर लावल्या. विद्यार्थी त्याचे नियमित श्रवण करत व त्यातून अध्ययन सुरू ठेवण्यात आले. याशिवाय शिक्षकांनी शाळेच्या भिंतींवर विविध शब्दचित्रे रंगून विद्यार्थ्यांना फावल्या वेळात त्याचे निरीक्षण करण्यास सांगितले व त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अध्यापन शिक्षकांनी सुरू ठेवले.

गल्ली तेथे फळा उपक्रम

तळोदा तालुक्यातील तळवे येथील शिक्षक गोकूळ बांगर यांनी तळवे गावात चौकाचौकात ठिकठिकाणी फळे ठेवले. कोरोना नियमांचे पालन करून त्यांनी गल्लीतील दहा-दहा विद्यार्थ्यांना बोलवून अध्यापनाचे कार्य लॉकडाऊनच्या काळात केले. या उपक्रमाला पालकांनीही प्रतिसाद दिला व आपल्या पाल्यांना या उपक्रमात समाविष्ट करून त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.

‘शिक्षण आपल्या दारी...’

ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘शिक्षण आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत थेट विद्यार्थ्यांच्या घरी जात शिक्षण देण्याचा उपक्रम तळोदा शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक नऊच्या शिक्षकांनी राबवला. पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने मोबाईल नाहीत, जे आहेत ते अँड्रॉइड नाहीत तर कुठे नेटवर्क कनेक्टिव्हिटीची अडचण यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापक योगेश सोनवणे, शिक्षिका कामिनी पवार, मोहन वळवी यांनी हा उपक्रम हाती घेतला होता.

झाडाखाली हसत-खेळत शिक्षण

१७ जून ते ३० जून २०२० या कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी दहा वाजता गायरान मोकळ्या जागेत आपापल्या बकऱ्या, गायी-ढोरे घेऊन एकत्रित जमायला सांगितले. त्या ठिकाणी अक्कलकुवा तालुक्यातील चोपलाईपाडा जि.प. शाळेचे शिक्षक गणेश पावरा हे उपस्थित होत असत. आळीपाळीने सर्व विद्यार्थ्यांना गलोलचा नेम धरून जांभूळ, करवंद पाडायला सांगत. पाडलेले जांभूळ, करवंद वेचून गोळा करायला लावले. त्या दरम्यान सर्व विद्यार्थी आळीपाळीने गुरे-ढोरे सांभाळत. गोळा केलेले करवंद-जांभूळ विद्यार्थ्यांना गणना करायला लावत. एकक, दशक, शतक असे गठ्ठे करायला लावत. कमी-अधिक करायला लावत. हे झाल्यानंतर गावात जाऊन शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून ते करवंद-जांभळे विकले. विद्यार्थ्यांना त्या पैशांचा रोजचा हिशेब लिहून ठेवायला सांगितले. दर शनिवारी सर्व हिशेब एकत्रित केला जायचा. करवंदे व जांभूळ विकून मिळालेल्या पैशातून विद्यार्थ्यांना वह्या-पेन घेण्यात आले. त्यांचे विद्यार्थ्यांमध्ये समप्रमाणात वाटप करण्यात आले. असा बहुआयामी फायदा या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा झाल्याचे शिक्षक गणेश पावरा सांगतात.