शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

योग्य दर्जाचे गतिरोधक टाकावेत नंदुरबार : तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान रस्ता दुरुस्ती करून देण्यात आली आहे. यातून वाहनांचा वेग ...

योग्य दर्जाचे गतिरोधक टाकावेत

नंदुरबार : तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान रस्ता दुरुस्ती करून देण्यात आली आहे. यातून वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. परंतु हे गतिरोधक कमी-अधिक उंचीचे असल्याने त्यावर धडकून वाहनांचे अपघात होत आहेत.

तळोदा ते आमलाड दरम्यान खड्डेच खड्डे

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील आमलाडा ते तळोदा शहर या अंतरात पडलेले खड्डे वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. खड्डे दुरुस्त व्हावेत तसेच आमलाड पुलावर योग्य तो भराव करून पूल दुरुस्त व्हावा अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. गुजरात हद्दीपर्यंतच्या खराब अशा रस्त्यामुळे सर्वच वाहनांना अडचण येत असून बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील महत्त्वाचे अंतर असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.

ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम हवी

बाेरद : तळोदा तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी आहे. पाऊस पडून गेल्याने गटारी व सांडपाणी यामुळे रोगराईचा धोका आहे. प्रशासनाने याबाबत सूचना करत मोहीम राबवून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

हळदाणी परिसरात शेतीकामांना वेग

हळदाणी : नवापूर तालुक्यातील हळदाणी परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना वेग आला आहे. विसरवाडी व हळदाणी परिसरात तूर, भात लागवड तसेच कापूस लागवडीवर शेतकरी भर देत असून त्यानुसार कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

विजेचा लपंडाव थांबवण्याची अपेक्षा

अक्कलकुवा : शहरातील विविध भागात दर दिवशी विजेचा लपंडाव सुरू आहे. यातून नागरिक त्रस्त आहेत. कंपनीकडून याबाबत कामकाज करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन शहरातील नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर काढून नवीन द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दूषित पाण्यामुळे ग्रामीण भागात चिंता

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील विविध भागात ग्रामपंचायतींकडून पुरवठा केले जाणारे पाणी हे दूषित असून यामुळे नागरिकांना जलजन्य आजार होण्याची शक्यता आहे. दूषित अशा पाण्यावर प्रक्रिया करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा

नंदुरबार : शहरालगतच्या विविध वसाहतींमध्ये मोकाट श्वानांचा संचार नागरिकांसाठी धोकेदायक ठरत आहे. या श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाघोदा, पातोंडा व होळ तर्फे हवेली शिवारात श्वानांचा संचार वाढला आहे.

लूपिन फाउंडेशनकडून लसीकरण जनजागृती

नंदुरबार : लुपिन ह्युमन वेल्फेअर आणि रिसर्च फाउंडेशनतर्फे कोविड लसीकरण जनजागृती करण्यात येत आहे. यांतर्गत जिल्ह्यात २०० गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याहस्ते नुकतेच उद‌्घाटन करण्यात आले.

सातपुड्यात गावोगावी वागदेव पूजन उपक्रम

धडगाव : सातपुड्यात गाव पाड्यांवर सध्या वाघदेव व इतर निसर्ग देवतांंचे पूजन सुरू आहे. यासाठी संपूर्ण गाव एकत्र येत निसर्गाचे आभार मानत असल्याचे दिसून येत आहे. धडगाव तालुक्यातील विविध भागात सध्या वाघदेव पूजन करून एकत्रित नैवेद्य दिला जात आहे.