शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यातून भाजीपाला आवक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून बाजार समितीत भाजीपाला आवक वाढली आहे. यामुळे दरांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. मेथी, ...

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून बाजार समितीत भाजीपाला आवक वाढली आहे. यामुळे दरांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. मेथी, कोबी, फ्लावर, पालक यासह विविध भाज्यांचे दर घसरल्याचे दिसून आले आहे. बाजारात वाटाण्याच्या शेंगांची मोठी आवक असल्याने त्यांचेही दर घसरल्याची माहिती देण्यात आली आहे. दर घसरल्याने शेतक-यांना फटका बसत आहे.

पथदिवे बंद असल्याने नागरिकांची नाराजी

नंदुरबार : शहरातील गुरव चाैक ते गुरुकुल चाैफुलीदरम्यान नवीन रस्त्यावर लावलेले पथदिवे बंदच आहेत. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गाने मोठ्या संख्येने नागरिक रात्री व पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी जात असतात.

बसेसला थांबा देण्याची मागणी

नंदुरबार : शहरापासून लांब अंतरावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आता वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाले आहे. यातून या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. यामुळे नाशिक मार्गाने येणा-या तसेच जाणा-या सर्व बसेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ साध्या बसेस थांबत असल्याने जिल्हा रुग्णालयात येणा-यांचे हाल होत आहेत.

वाहनांमुळे त्रस्त

नंदुरबार : शहरातील तळोदा रोडवरून बायपास रोडकडे वळण घेणा-या वाहनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. सीबी पेट्रोलियम जवळून वळणारी वाहनांचा वेग कमी होत नसल्याने अपघाती स्थिती निर्माण होते. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी थांबूनही अवजड वाहनांचा वेग कायम असतो.

रस्ते दुरुस्तीची मागणी

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील वैंदाणे, शनिमांडळ, तलवाडे यासह विविध गावांच्या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे. जिल्हा परिषदेने येथील रस्त्यांचे खड्डे भरण्यासह साईडपट्ट्या दुरुस्तीची कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलीस ठाण्यामुळे व्यक्त होतेय समाधान

नंदुरबार : तालुका पोलीस ठाण्याची इमारत भालेर रस्त्यालगत बांधण्यात आली होती. काही वर्षांपासून पडून असलेल्या या इमारतीत तालुका पोलीस ठाणे सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या असून पोलीस ठाण्यामुळे आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या भुरट्या चो-या आणि मद्यपींकडून केला जाणारा धिंगाणा थांबला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शेतक-यांना मदत देण्याची अपेक्षा

बोरद : गेल्या काही महिन्यांपूर्वी बोरदसह परिसरात चक्रीवादळ व अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झाले होते. यातून घरे आणि पिकांना बाधा पोहोचली होती. यातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने भरपाईची मागणी आहे.

शेतक-यांना भरपाई देण्यासाठी पाठपुरावा

बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक-याने लागवड केलेल्या टरबुजाचे बियाणे हे निकृष्ट असल्याने त्यांना फटका बसला आहे. या शेतक-याला शासनासह संबंधित कंपनीकडून भरपाई करून देण्याची मागणी आहे.

रस्ता काम पूर्ण झाल्याने समाधान

नंदुरबार : वाका ते नंदुरबारदरम्यान रस्ता काम पूर्ण झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेवाळी ते नेत्रंग महामार्ग म्हणून परिचित असलेल्या या रस्त्यावरचे खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत होते. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नव्हती. दरम्यान या रस्त्याच्या कामास निधी मंजूर झाल्याचे वृत्त लोकमतने प्रथम दिले होते. यानंतर प्रशासनानेही काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते. यानुसार नंदुरबार शहर हद्दीत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे येथून प्रवास करणा-यांचे होणारे हाल थांबले आहेत.