शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

मागील दोन वर्षांपासून पावसाळा चांगला झाल्यामुळे विहिरी तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ...

मागील दोन वर्षांपासून पावसाळा चांगला झाल्यामुळे विहिरी तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, भुईमूग तसेच पालेभाज्या अशी विविध पिके घेतली. यापैकी गहू, हरभरा, बाजरी यासारख्या पिकांची काढणी सर्वच शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने केली.

दरवर्षी सर्व शेतकरी खरीपपूर्व व खरीप हंगामातील पिकांसाठी जमिनीची मशागत ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच करीत असतात. कारण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलजोडीने नांगरणी, वखरणी ही कामे जवळ-जवळ सगळीकडे बंद झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय सर्व खेड्यापाड्यांमध्ये जनावरांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच झालेली आहे. सध्या जयनगरसह पंचक्रोशीतील गावांमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणीचे दर एक हजार ४०० रुपये प्रति एकर असा आहे. तसेच रोटरचे भाव प्रति एकर एक हजार २०० रुपये असा आहे. यावर्षी डिझेलचे दर खूप वाढल्याने ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढविण्यात आल्याचे ट्रॅक्टर मालकांकडून सांगण्यात येत आहे. सध्या डिझेलचा दर ८७ रुपये प्रति लिटर असा आहे.

डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतीची मशागत करीत असताना शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. नांगरणी, वखरणी, रोटरच्या कामासोबत शेतकऱ्यांकडून शेतातील काडीकचरा तसेच बांधावरील झाडेझुडपे तोडण्याचे कामही सुरू असल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांचे जीवन हे निसर्गावर आणि शासनाच्या धोरणावर अवलंबून असते. कितीही संकटे आली तरी तो मोठ्या धैर्याने सर्व संकटांना सामोरे जाऊन आपले कर्तव्य नेहमीच बजावत असतो. फक्त शासनाने शेतमालाला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज करायला हवे. - वैभव राजू पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा