शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

घनकचऱ्यातून खत निर्मिती करणाऱ्या यंत्राचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : घनकचऱ्याचे विलगी करण करून त्यापासून खत तयार करण्यासाठी नवापूर पालिकेने ३२ लाख रूपये खर्चून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : घनकचऱ्याचे विलगी करण करून त्यापासून खत तयार करण्यासाठी नवापूर पालिकेने ३२ लाख रूपये खर्चून कार्यान्वित केलेल्या क्रिनींग मशिन व सिंगल शॉप मशिनचे आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  नवापूर नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत राज्य शासनाकडून घनकचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी डीपीआर अंतर्गत ओला व सुका कचऱ्याची मळणी करून खत तयार करण्यासाठी क्रिनींग मशिन व सिंगल शॉप मशिन खरेदी केले आहे. पालिकेस यासाठी ३२ लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. ही दोन्ही यंत्रे खरेदी करून ते कार्यन्वित करण्यात येऊन त्यांचे लोकार्पण आमदार शिरीष नाईक व नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका प्रशासन लोकहितासाठी विविध योजना व त्या अंतर्गत सुविधा पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. चांगल्या कार्यासाठी आपण नेहमी साथ दिली असून, लोकहिताची सर्व कामे करण्यासाठी या पुढेही सहकार्य करू असे आमदार शिरीष नाईक यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, नगरसेविका बबीता वसावे, माजी नगरसेवक अजय पाटील, सुभाष कुंभार, फारूक शहा, मुख्याधिकारी तृप्ती धोडमीसे, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, मिलिंद भामरे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार तर आभार आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी हरीन अटालीया, विजय सामुद्रे, मिलिंद पाटील, अशोक ढंडोरे व अजय तांबोळी यांनी परीश्रम घेतले. 

 

जी.एम. पोर्टलव्दारे ३२ लाखाचे मशिन २७ लाखात खरेदी करण्यात आले आहे. सेंडर मशिनमध्ये ओला कचरा मळणी करण्यात येईल व क्रिनींग मशिनमध्ये घरगुती कचरा टाकून प्लास्टिक, रबर व इतर कचरा वेगळा करून त्यांचीही मळणी करता येऊ शकते. दोन्ही मशिनमध्ये मळणी झालेल्या कचऱ्याची योग्य प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाईल.     - राजेंद्र चव्हाण, आरोग्य निरीक्षक