शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवमाेगरा माध्यमिक विद्यालयात प्रतिमा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील के.डी. गावीत माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सायना वसावे ...

नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील के.डी. गावीत माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सायना वसावे व चांदणी वळवी या विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात संजय महाजन यांनी शिवरायांचे आठवावे रूप या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक मनोहर साळुंके, हेमांगी पाटील, सुनील पाटील, मनोज सूर्यवंशी, उदय पाटील, नूतन पाडवी, माधुरी साठे, अतुल गावीत, कन्हैयालाल पाटील, राकेश पाटील उपस्थित होते.

सती गाेदावरी माध्यमिक विद्यालय, म्हसावद

म्हसावद, ता. शहादा येथील सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापिका सुरेखा गुजर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थिनींनी पोवाडा नृत्य सादर केले. संस्थाचालक संघ नंदुरबारतर्फे शिवाजी महाराजांवर आधारित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात यश गोकूळ धनगर याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याचा प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. १३ विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक योगेश पाटील, उपशिक्षिका के.डी. अहिरे, पूनम सूर्यवंशी, जे.टी. पवार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्पना अहिरे तर आभार ए.बी. पाटील यांनी मानले.

प्राथमिक विद्या मंदिर, नंदुरबार

नंदुरबार शहरातील हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिर व संस्कृती शिशू विहार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रेरणास्थान हिरालाल चौधरी व सचिव रूपेश चौधरी उपस्थित होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्राथमिक विद्या मंदिराचे शिक्षक युवराज भामरे, सतीश काटके, सुधाकर ठाकूर, साई चौधरी आदी उपस्थित होते.

म्हसावद

म्हसावद, ता. शहादा येथील तरुण मित्र मंडळातर्फे श्रीराम मंदिर चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली. प्रारंभी सरपंच आक्काबाई ठाकरे, उपसरपंच चिंतामण लांडगे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी पंकज लामगे, अशोक बागले यांनी शिवरायांचे महात्म्य सांगून त्यांचे आचार, विचारांचे व आदर्श घेण्याचे तरुणांना आवाहन केले. कार्यक्रमास सुधाकर पाटील, छोटूलाल लामगे, प्रसाद लामगे, कुणाल बोरसे, मोहीत न्याहाळदे, दुर्गेश ठाकरे, शुभम जगदाळे, सूरज भिल, भागवत ठाकरे उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपराज धनगर याने केले.