तळोदा परिसरातून अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:38 IST2020-04-15T12:38:40+5:302020-04-15T12:38:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील शहादा रोडवर एका हॉटेलमागे चोरट्या पद्धतीने सुरु असलेली मद्याची विक्री थांबवत पोलीसांनी ...

 Illegal liquor seized from Taloda area | तळोदा परिसरातून अवैध मद्य जप्त

तळोदा परिसरातून अवैध मद्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा शहरातील शहादा रोडवर एका हॉटेलमागे चोरट्या पद्धतीने सुरु असलेली मद्याची विक्री थांबवत पोलीसांनी कारवाई केली़ तसेच सतोना ता़ तळोदा येथे गावठी मद्य जप्त करुन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला़
शहादा रस्त्यावरील हॉटेलमागे संजय ब्रिजलाल चौधरी हा अवैध पद्धतीने मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी याठिकाणी छापा टाकून ८ हजार २४६ रुपयांचे देशी विदेशी मद्य आणि बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धरमसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरुन संजय ब्रिजलाल चौधरी याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक राजधर जगदाळे करत आहेत़
दरम्यान तळोदा तालुक्यातील सतोना येथे गावठी हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती होत असल्याचे तळोदा पोलीस ठाण्याच्या पथकाला समजून आले होते़ त्यानुसार पथकाने किरण गेबू वळवी याच्या घरावर छापा टाकून ६ हजार रुपये किमतीची ३०० लीटर दारु जप्त केली़ याप्रकरणी पोलीस नाईक कमलगिं सत्तारसिंग जाधव यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्यादीवरुन किरण वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किसन वळवी करत आहेत़ तालुक्यातील विविध भागातून अवैध मद्याची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळत असल्याने त्यांच्याकडून कारवाई सुरु आहे़

Web Title:  Illegal liquor seized from Taloda area