शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ढाब्यांवरील अवैध दारु विक्री बंद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर व परिसरात रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या जागांवर विनापरवाना ढाब्यांवर सुरु असलेली अवैध दारु विक्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहर व परिसरात रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या जागांवर विनापरवाना ढाब्यांवर सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करुन संबंधित जागा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शहादा शहर व तालुका बिअरबार, परमीट रुमचालक व देशी दारु विक्रेते असोशिएशनतर्फे प्रांताधिकारी चेतन गिरासे व तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.असोसिएशनतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा शहर व परिसरात शासनाची कुठलीही परवानगी न घेता खुलेआमपणे ढाब्यांवर अवैधरित्या मद्य विक्री सुरु आहे. अशा ठिकाणी बनावट मद्य विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काही दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने मलोणी, ता.शहादा परिसरात धाड टाकून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता व मध्य प्रदेशातील दोन आरोपींसह सुमारे १२ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या ढाबे चालकांकडे मद्यविक्रीचा अधिकृत परवाना नसल्याने येथे सुरु असलेली मद्यविक्री ही अवैध असून यात बनावट मद्याचा समावेश असू शकतो.शहादा शहर व परिसरात सुरु असलेल्या ढाब्यांच्या जमिनी या रहिवासी प्रयोजनार्थ अकृषीक (एन.ए.) झाल्या असून येथे हॉटेल व्यवसाय कायद्यानुसार सुरु करता येत नाही. असे असतांनाही कुठलाही व्यावसायिक व वाणिज्यीक परवाना नसताना हे ढाबे गेल्या अनेक वर्षापासून खुलेआमपणे सुरु आहे. त्याचप्रमाणे या हॉटेल व ढाबे चालकांकडे खाद्य पदार्थ विक्रीसाठी आवश्यक असलेले फुड लायसन्सही नाही. असे असतांनाही या ठिकाणी हॉटेल व ढाबे सुरु आहेत. परवानाधारकांना दरवर्षी एप्रिल महिन्यात परवाना नूतनीकरण करताना जागेबाबत वाणिज्य प्रयोजन व खाद्य पदार्थ विक्रीसाठी फुड लायसन्स आवश्यक असते. हे दोन्ही प्रकार नसले तर आमचा परवाना नूतनीकरण होत नाही. हाच नियम या ढाबे चालकांना का नाही? त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत परवाना नसताना नियमबाह्यरित्या त्यांच्याकडून हॉटेल व ढाबे व्यवसाय सुरु असल्याने त्यांच्यावर अद्यापपावेतो संबंधित विभागांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. या अवैध ढाब्यांवर व जागा मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अरुण चौधरी, संजय चौधरी, राहुल चौधरी, शितल जयस्वाल, बी.एम. जयस्वाल आदीसह परमीटरुम चालक, देशी दारू विक्रेत्यांच्या सह्या आहेत.आम्ही लोकशाही मार्गाने गेल्या सहा महिन्यापासून याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे पाठपुरावा करीत आहोत. मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. आपण जागेच्या प्रयोजनात बदल करणाऱ्या जागा मालकांसह येथे सुरु असलेल्या हॉटेल व ढाबे व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. निवेदनासोबत शहर व परिसरात सुरु असलेल्या ढाब्याची यादीही सादर केली आहे.