शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- अभिजीत पाटील यांचा राजकीय संकल्प संधी मिळाल्यास २०२२ ची निवडणूक पुन्हा लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:16 IST

विधान परिषदेच्या या निवडणुकीत खूप शिकायला मिळाले. आपल्या कामाचा विस्तारही वाढला. धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील प्रश्न समजून घेता आले. -अभिजीत पाटील.

  रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्कधुळे-नंदुरबार स्थानिक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी ही निवडणूक आपल्यासाठी खूप काही अनुभव, राजकीय डावपेच, दोन्ही जिल्ह्यातील समस्या, प्रश्न समजून घेण्यासाठी एक संधी मिळाली होती. त्यामुळे पराभव झाला असला तरी ही निवडणूक आपल्यासाठी आगामी निवडणुची रंगीत तालीम होती. त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी करून विजय निश्चित मिळवेल असा दावा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.

आपल्या या निवडणुकीतील पराभवाची कारणे काय?ही निवडणुक जेंव्हा जाहीर झाली तेंव्हा उमेदवारी करायला कुणी पुढे येत नव्हते. एकतर केवळ अल्पकाळासाठी ही निवडणूक होणार होती शिवाय समोर भाजपचे भक्कम उमेदवार होते. या स्थितीत आपण निवडणूक लढविण्याची हिंमत केली. महाविकास आघाडीने आपल्याला अधिकृतपणे उमेदवार म्हणूनही घोषीत केले. मात्र, मध्यंतरी लॅाकडाऊनमुळे निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे प्रचारात काही त्रुटी राहिल्यात. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही समन्वयात काही उणीवा रााहिल्या. पण कुणावरही आपला दोषारोप नाही. पराभवाची जबाबदारी स्वत:च स्विकारतो. कारण मी या निवडणुकीकडे  मोठे व्यासपीठ म्हणून एक संधी म्हणून पाहिले. त्यातून खूप शिकता आले. कामाचा विस्तार वाढला. दोन्ही जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क आला. काही प्रश्न समजून घेता आले. हीच माझ्यासाठी जमेची बाजू आहे. 

विदेशातील नोकरी सोडून सेवेसाठीच आलो मी विदेशात उच्च सेवेच्या नोकरीवर होतो. परंतु आपल्या भागात लोकांची सेवा करता यावी यासाठी नोकरी सोडून स्थानिक राजकारणात आलो. जिल्हास्तरावर सेवेची संधी मिळाल्यानंतर त्याचा विस्तार वाढावा यासाठी विधानपरिषद निवडणूक लढविली.  पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे एकजूट नव्हती या निवडणुकीत पश्चित महाराष्ट्रात ज्या प्रमाणे महाविकास आघाडीत एकजूट होती तशी एकजूट धुळे-नंदुरबार जिल्ह्यात नव्हती. त्यात काही उणीवा होत्या. ही एकजूट राहिली असती तर निश्चितच येथे वेगळे वातावरण राहिले असते. आघाडीचा नवीन संसार असल्याने तो घट्ट होण्यास काही कालावधी लागेल. पण पुढील निवडणुकीपर्यंत निश्चित ही एकजूट मजबूत होईल असा आपल्याला विश्वास आहे.