शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकांनी जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जाते. अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध होणारी रिक्षा सर्वसामान्यांना प्रवासासाठी हक्काचे व्यासपीठ ...

सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जाते. अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध होणारी रिक्षा सर्वसामान्यांना प्रवासासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, ठराविक अंतरावर प्रवाशांची वाहतूक, घरगुती सामानाची वाहतूक, वेळप्रसंगी रुग्णालयात जाण्यासाठी प्रामुख्याने रिक्षाचा वापर सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातो. रिक्षाचा व्यवसाय किफायतशीर असल्याने अनेक शिक्षित तरुणांना रोजगाराचा प्रमुख आधार ठरला आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक बेरोजगारांनी रिक्षा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी चौकाचौकात सहजगत्या रिक्षा उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे ठरले आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच गेल्या वर्षभरापासून या संकटामुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आला होता. आता कुठेतरी स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती. पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आता जगायचे कसे? असा सवाल रिक्षावाल्यांना छळतो आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षावाल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपयांची मदत वर्ग करण्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा अल्प प्रमाणात असला तरी ज्या रिक्षाचालकांची नोंदणी नाही अशांनी आता करायचे काय? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे. सरसकट प्रत्येक रिक्षाचालकाला शासनाने दीड हजार रुपये अनुदान देण्याची गरज असल्याचे मत रिक्षाचालक व्यक्त करीत आहेत.

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. व्यवसाय करण्याची इच्छा असताना साथ मिळाली नाही. अशा परिस्थितीत मित्रांकडून उसनवार पैसे घेऊन रिक्षा घेतली. दिवस-रात्र मेहनत करून कुटुंबीयांचे पोट भरत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प होणार असल्याने आता पुन्हा करायचे काय असा प्रश्न छळतो आहे.

-नितीन कश्यप, रिक्षाचालक, शहादा

कोरोना विषाणू संकटामुळे गेल्या वर्षभरापासून प्रचंड हाल झाले आहे. रिक्षा विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज थकले आहे तर त्यावरील व्याजाचा डोंगर वाढला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने जाहीर केलेली मदत सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत अल्प आहे.

-पिंटू चौधरी, रिक्षाचालक, शहादा

बँकेकडून कर्ज घेऊन रिक्षा घेतली व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू केली. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा व खाजगी क्लासेस बंद असल्याने व्यवसाय झाला नाही. अशा परिस्थितीत थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावला आहे. शासनाने अल्प मदत जाहीर करण्याऐवजी थकीत कर्जावरील व्याज माफी दिली पाहिजे. रिक्षा चालक जगण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

-दीपक जव्हेरी, रिक्षाचालक, शहादा