शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! भरधाव कंटेनर थेट घरांमध्ये घुसला; एक ठार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:49 IST

अपघातात चार घरांचे नुकसान झालं असून दोन वाहनांनाही धडक बसली आहे.

नंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार घरांना धडक दिली. एकाला १०० फूट फरफटत नेल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला, तर एक वृद्ध महिला जखमी झाली. याशिवाय टेम्पो व दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

संजय भिका ठाकरे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून, धनाबाई माळी या गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा - खेतीया रस्त्यावरील ब्राह्मणपुरी गावात खेतीयाकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र. डीडी ०१ पी ९७३५) रस्त्याचा कडेला असलेल्या भाईदास नेवरे यांच्या घरातील पत्र्याचा शेडसह संजय भिका ठाकरे, विजय माळी, मोहन काळू मराठे, कमलेश तावडे यांच्या घराला धडक दिली. यात घराच्या ओट्यावर झोपलेले संजय भिका ठाकरे यांचा चिरडून मृत्यू झाला, तर धनाबाई माळी या वृद्धेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप बचावले.

अपूर्ण रस्ता काम आणखी किती बळी घेणार...ब्राम्हणपुरी गावातून जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गेल्या ११ महिन्यांपासून ब्रेक लागला आहे. खोदून ठेवलेले खड्डे त्याचबरोबर गतिरोधक तसेच रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहे.यामुळे रस्त्याचे अपूर्ण काम नागरिकांच्या जीवावर उठले असून आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चालक बहादूर रतन डवर रा. गंधवानी, जि. धार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार युवराज पाटील करीत आहे. घराच्या भिंती, पत्रे, घरातील साहित्य व दोन्ही वाहनांचे पार्ट रस्त्यावर विखुरले..अपघात एवढा भीषण होता की, घरांच्या भिंती, मयत संजय ठाकरे हे झोपलेली खाट, घराचे पत्रे, झाडाच्या फांद्या, विटांचा खच, मोटारसायकल, कमलेश तावडे यांचा टेम्पो भररस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. त्याचा पाठलाग करत नागरिकांनी खेतीया येथील नागरिकांचा मदतीने ट्रकचालकास पकडले. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नीलेश देसले, उपनिरीक्षक भूपेंद्र मराठे यांच्यासह म्हसावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ब्राह्मणपुरीचे पोलिसपाटील रवींद्र पवार, प्रवीण  पाटील, नंदकिशोर सोनार, अनिल थोबी, मनोहर सोनार, अर्जुन राजपूत, सुनील गिरासे, भगवान मराठे आदी ग्रामस्थांनी मदतकार्य केले. अपघातात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून बाहेर उभे असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Accidentअपघात