शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

बिजरी येथील जि.प.शाळेच्या शिक्षिका कविता पाटील यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही व विशेष म्हणजे धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातील बिजरी या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद ...

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही व विशेष म्हणजे धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातील बिजरी या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एकमेव शिक्षिका कविता पाटील यांना औरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी उपक्रमात राज्याचे शालेय मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. या वेळी औरंगाबादचे सीईओ मंगेश गोंदवले, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांसह राज्यातील ४०० शिक्षक उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून या ऑनलाइन ॲपचे ऑफलाइनमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. या वेळी बच्चू कडू म्हणाले की, कोरोना काळात सर्वकाही बंद असताना फक्त दवाखाने आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. देशाची पिढी घडविणारा शिक्षक हाच खरा देशाचा रक्षक आहे. ऑनलाइन पाठात सर्वात जास्त लाईक आणि व्ह्यूवर्स असलेल्या शिवरायांचे बालपण या ऑनलाइन पाठाच्या वेळी प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन पाठ घेणाऱ्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभूती देणाऱ्या संजय रणदिवे या शिक्षकाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.त्यांनी सर्वच शिक्षक व शिक्षिका याचे अभिनंदन केले. या वेळी पुरस्कार मिळालेल्या शिक्षिका व गटविकास अधिकारी जयंत बाबरे, गटशिक्षणाधिकारी वसंत मनवरकर, पंचायत समिती सभापती कविता बोरेकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रूपराव सावरकर, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, केंद्रप्रमुख राजीव खोजरे यांनी सर्वांचे कौतुक केले.

संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना या महामारीमुळे जग थांबूनच गेले होते. पण, त्याच काळात घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा. जिल्हा परिषद लाईव्ह शिक्षण या उपक्रमांनातर्गत मुले शाळाबाह्य होऊ नये व ती कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावी, यासाठी घरातूनच मुलांसाठी रोज शैक्षणिक पाठांचे लाईव्ह सादरीकरण केले जात होते. त्यात राज्यातील अनेक शिक्षिकांसोबत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिजरी या जिल्हा परिषद शाळेची एकमेव शिक्षिका कविता पाटील यांनीही भाग घेतला होता. व त्यांनादेखील औरंगाबाद येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.