शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षीय नागरिकांनी लसीकरण सहभागी होण्यासाठी होम टू होम शिक्षकांचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

नवापूर शहरी भागातील गल्ली गोळ्यांमध्ये शिक्षक ‘होम टू होम’ जाऊन ४५ वर्षीय लोकांनी लसीकरण करावे, यासाठी नोंदणी करत आहे. ...

नवापूर शहरी भागातील गल्ली गोळ्यांमध्ये शिक्षक ‘होम टू होम’ जाऊन ४५ वर्षीय लोकांनी लसीकरण करावे, यासाठी नोंदणी करत आहे. लसीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ज्या नागरिकांनी लसीकरण केले आहे, अशांचे नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक एका तक्त्यात नोंदी केल्या जात आहे.

नंदूरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने लसीकरणाच्या बाबतीत जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी ग्रामस्थ लसीकरणाला घाबरत असून, सोशल मीडियावर चुकीच्या मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये लसीकरणाने भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण एकमेव उपाय असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, परंतु ग्रामीण भाग असो की, शहरी भाग यातून लसीकरणाला अल्पसा प्रतिसाद दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरण करावे, यासाठी आवाहन करीत आहे. शिक्षकांना ग्रामीण व शहरी भागात पाठवून मतदान यादीतील ४५ वर्षीय नागरिकांचा गट तयार करून सर्वांच्या नोंदी घेत, ‘होम टू होम’ सर्व्हे करण्यासाठी जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सज्ज झाले असून सर्व्हे करीत आहे. कोरोनाचा काळात शिक्षकांचा ‘होम टू होम’ सर्व्हे चांगल्या पद्धतीने केला जात आहे.

कोरोना काळात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने व यंत्रणेवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी शिक्षकांना काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आले आहे.

शिक्षकांकडे नवापूर सीमा नाक्यावर नोंदी करणे, होम टू होम सर्व्हे करणे, पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींना कॉल करून माहिती घेणे, असे काम शिक्षकांकडून केले जात आहे. शाळा जरी बंद असल्या, तरी शिक्षकांची भूमिका कोरोना काळात महत्त्वाची ठरत आहे.