कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:53+5:302021-03-23T04:32:53+5:30

गेल्या दोन दिवसांपासून पाडळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनकवाडा, कोकणवाडा भागात तापसदृश आजारासंदर्भात औषधी गोळ्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात ...

Holding a meeting to prevent the growing prevalence of corona | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन

गेल्या दोन दिवसांपासून पाडळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनकवाडा, कोकणवाडा भागात तापसदृश आजारासंदर्भात औषधी गोळ्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहेत. तसेच म्हसावद गावाशी परिसरातील गावातील ग्रामस्थांचा बँक, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, सोसायटी, शाळा, बाजारहाट, दैनंदिन व्यवहारासाठी संपर्क होत असतो. यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा जरी पर्याय नसला तरी जे नागरिक बेजबाबदार पद्धतीने वागत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापरासह सॅनिटायझेशनचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाेलीस प्रशासनासह ग्रामपंचायतीनेही ठोस कारवाई करण्याची अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी म्हसावद गावात सोमवारी भरणारा बाजार बंद करण्यासह जनता कर्फ्यू लावण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.

मंगळवारी ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांची संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे. - भटेसिंग गिरासे, ग्रामविस्तार अधिकारी, म्हसावद

Web Title: Holding a meeting to prevent the growing prevalence of corona