शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

गुजर समाजातील ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 7:12 PM

निझर येथे एकवटले समाज बांधव : 23 जोडपी विवाहबद्ध, शिस्तीचे दर्शन, हजारोंची उपस्थिती

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़18 : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात स्थिरावलेल्या गुजर समाजातील निझर येथे झालेला सामूहिक विवाह सोहळा हा समाजासाठी ऐतिहासिक म्हणून नोंदला गेला. समाजात प्रथमच एकाचवेळी 23 जोडपी विवाहबद्ध झाले असून या सोहळ्यासाठी हजारो समाज बांधव एकवटले होते.नंदुरबार जिल्ह्यात तथा गुजरात आणि मध्य प्रदेशातील सीमेवरील भागात गुजर समाजाचे मोठे वास्तव्य आहे. स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी या समाजातील विवाह सोहळ्यांना लावून दिलेली शिस्त ही सर्वत्र कौतुक आणि चर्चेचा विषय आहे. या समाजात सामूहिक विवाह सोहळा ही संकल्पना नवीन रुढ झाली. गेल्यावर्षी प्रायोगिक स्तरावर प्रकाशा येथे झालेल्या सोहळ्यानंतर यंदा मात्र प्रथमच भव्य स्तरावर हा सोहळा झाला. त्यात 23 जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्यात सर्वाधिक जोडपी विवाहबद्ध झाल्याने समाजातील तो एक ऐतिहासिक सोहळा ठरला. त्यासाठी निझर येथील गुजर समाज युवक मंडळ व गुजर समाज मंच यांनी पुढाकार घेतला होता.सकाळपासूनच या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरूनही मोठय़ा प्रमाणावर समाज बांधव जमले होते. लगआचा मुहूर्त 10 वाजून 55 मिनीटांचा होता. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजताच नवरदेवांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. लगअ मंडपात प्रत्येक जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ व त्याला क्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार त्या-त्या व्यासपीठावर वर-वधू विराजमान होऊन त्यांच्यासमोर त्याच वर-वधूचे नातेवाईकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक जोडप्यांना विधीसाठी स्वतंत्र पुरोहित नेमण्यात आले होते. मंगलाष्टक मात्र सामूहिकपणे म्हणण्यात आले व नियोजित वेळेवर लगअ लावण्यात आले.या वेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील, आमदार सुनील गावीत, गुजरातमधील सुमूल डेअरीचे संचालक भरतभाई सुदामभाई पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, पं.स.चे माजी सभापती माधव जंगू पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटीलआदी उपस्थित होते.