शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बिगर नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही मदत जाहीर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

जिल्ह्यात चार नगरपालिका, एक नगरपंचायत व एक ग्रामपंचायत कार्यरत आहे. सहा तालुक्यांत नोंदणीधारक फेरीवाल्यांची ००० संख्या एवढी असून, त्यापेक्षा ...

जिल्ह्यात चार नगरपालिका, एक नगरपंचायत व एक ग्रामपंचायत कार्यरत आहे. सहा तालुक्यांत नोंदणीधारक फेरीवाल्यांची ००० संख्या एवढी असून, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक संख्या विना नोंदणीधारक फेरीवाल्यांची आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या बचत खात्यावर दीड हजार रुपये अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत होत असले तरी जे दररोज हातगाडीवर व्यवसाय करतात, ज्यांची कुठेच नोंदणी नाही अशांसाठी कुठलीही योजना शासनाने जाहीर केली नसल्याने बिगर नोंदणीकृत फेरीवाल्यांतर्फे आम्हालासुद्धा शासनाने या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शासनाने या कालावधीत आम्हा फेरीवाल्यांना सकाळी सात ते संध्याकाळी सात असा व्यवसाय करण्याची परवानगी दिल्यास याचा आम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. यासोबतच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र हॉकर्स झोन फेरीवाल्यांसाठी आरोग्य सुरक्षा कवच साधी योजनांचाही लाभ देणे गरजेचे आहे. आम्ही दिवसभर मेहनत करून आमच्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालवीत असल्याने शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष न करता आमच्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केली पाहिजे, असे मत फेरीवाल्यांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पालिकेमार्फत अधिकृत हॉकर्स झोन नसल्याने व्यवसाय करताना रस्त्यावर उभे राहावे लागते. हातगाडी भाड्याने घ्यावी लागते. दिवसभर उन्हातान्हात काम करावे लागते. कधी पोलिसांचा त्रास, तर कधी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचा जाच. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ नाही, वेळप्रसंगी कर्ज काढून व्यवसाय करावा लागतो.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. भाजीपाला हा नाशवंत प्रकार असल्याने सकाळी खरेदी केलेला माल हा सायंकाळपर्यंत विक्री झाला नाही तर आर्थिक नुकसान होते. शासनाने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे. त्याऐवजी दिवसभर व्यवसायास परवानगी द्यावी.

- शरीफ बागवान, फेरीवाला, शहादा

शहरातील विविध भागात हातगाडीवरून संसारोपयोगी साहित्य विक्री करून रोजीरोटी कमवत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांकडून खरेदीला फारसा उत्साह नाही. अशा परिस्थितीत सायंकाळी घरी गेल्यावर मन निराश होते. शासनाने मदत जाहीर करण्याऐवजी ठोस उपाययोजना करावी.

-विक्रम सोनवणे, फेरीवाला, शहादा

उच्चशिक्षण घेतले, मात्र नोकरीची संधी मिळाली नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून हातगाडीवर भाजीपाला व फळ विक्री करीत आहे. गेल्या महिनाभरापासून संचारबंदीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच अधिकृत नोंदणी नसल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचा मला कुठलाच फायदा होणार नाही. शासनाने बिगर नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठीही अनुदान जाहीर करावे.

- शशिकांत अहिरे, फेरीवाला, शहादा