नंदुरबारमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे महिला आणि 19 जनावरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 10:03 IST2018-08-17T09:58:18+5:302018-08-17T10:03:58+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व धडगाव येथे गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे.

heavy rain in nandurbar | नंदुरबारमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे महिला आणि 19 जनावरांचा मृत्यू

नंदुरबारमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे महिला आणि 19 जनावरांचा मृत्यू

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व धडगाव येथे गुरूवारी ( 16 ऑगस्ट) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील बालाहाट येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर विसरवाडी येथे पावसामुळे आतापर्यंत 19 जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

नवापूर तालुक्यात 140 मि.मी. तर धडगाव तालुक्यात 102 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.  नंदुरबार तालुक्यात 51 मि.मी.पाऊस झाला आहे. नवापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. तसेच नंदुरबारमध्ये येत्या 24 तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: heavy rain in nandurbar