शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राच्या पडक्या इमारतीमुळे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील सर्वात मोठय़ा आणि उपयोगी अशा बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचा:यांसाठी बांधलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील सर्वात मोठय़ा आणि उपयोगी अशा बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचा:यांसाठी बांधलेली निवासस्थाने जीर्ण झाली आहेत़ यामुळे याठिकाणी राहणा:यांचे जीव धोक्यात आह़े       शहादा व तळोदा तालुक्यातील साधारण 40 च्या जवळपास गावांना सुविधा देणा:या बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कालौघात जीर्ण झाली आह़े सोबतच याठिकाणी बांधण्यात आलेली निवासस्थाने पडकी झाली आहेत़ या संपूर्ण परिसराचा कायापालट करुन नवीन आरोग्य केंद्र निर्माण करण्यासाठी एनआरएचएमअंतर्गत जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी 5 कोटी रुपयांना मंजूरी दिली होती़ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तळोदा तालुक्यातील सोमावल, बोरद आणि प्रतापपूर हे तीन तर अक्कलकुवा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना साधारण तीन ते पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती देऊन शिक्कामोर्तब केले गेले होत़े यानंतर काही ठिकाणी कामे सुरु झाली असली तरी बोरद येथे मात्र अद्याप कोणतेही काम सुरु झालेले नसल्याने 50 वर्षापूर्वीच्या जुन्या बांधकामातच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णसेवा करत आहेत़ सध्या पावसाळा सुरु असल्याने निवास आणि केंद्राची इमारत दोन्हीही गळत असल्याचे सातत्याने दिसून येत आह़े यामुळे अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांऐवजी बोरद आणि परिसरात खाजगी घर भाडय़ाने घेऊन राहत आहेत़ यातून रात्री अपरात्री गंभीर स्वरुपातील रुग्ण दाखल झाल्यास रुग्णांच्या नातलगांना आरोग्य विभागाच्या कर्मचा:यांचा शोध घ्यावा लागत आह़े हा प्रकार थांबवण्यासाठी घरांची तात्पुरती दुरुस्ती करुन इमारत नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी बोरद आणि परिसरातील गावांमधून होत आह़े 

तळोदा रस्त्याला लागून असलेल्या बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांना गेल्या वर्षी मंजूरी देण्यात आली होती़ यातील 30 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता़ परंतू लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निधी आणि बांधकाम सुरु करण्याबाबतचे आदेश लांबल़े आचारसंहिता संपल्यानंतर हे काम सुरु होण्याची अपेक्षा होती़ परंतू आता पुन्हा जिल्हा परिषद किंवा विधानसभा निवडणूका लागल्यास आरोग्य केंद्राचे काम सुरुच होऊ शकणार नाही़ येथील वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 आणि 2 तसेच आरोग्य कर्मचा:यांची निवासस्थाने कधी कोसळतील अशी स्थिती आह़े यात साप आणि विंचू यांचा सुळसुळाट झाल्याने आरोग्य कर्मचा:यांचे जीव धोक्यात आहेत़ निवासस्थानांच्या तात्पुरत्या दुरुस्त्या करुन राहणे शक्य असल्याने समस्या निकाली काढण्यासाठी कर्मचा:यांनी पाठपुरावा करुनही आतार्पयत कारवाई झालेली नाही़