शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हातपंप दुरुस्ती करणाऱ्या पथकांना वाहन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत सर्व सहा तालुक्यात टाकण्यात आलेल्या हातपंप दुरुस्तीसाठी नियुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत सर्व सहा तालुक्यात टाकण्यात आलेल्या हातपंप दुरुस्तीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांना वाहनच नसल्याची स्थिती आहे़ यामुळे यंदा हातपंपांची दुरुस्ती करण्याची कामे रखडल्याचे चित्र आहे़टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्व सहा तालुक्यात हातपंप दुरुस्ती पथके कार्यान्वित केली होती़ या पथकांना वाहने मंजूर करण्यात आली होती़ नवीन वाहन खरेदी किंवा भाडोत्री वाहन करुन पथकांनी तालुक्यात भेटी देऊन दुरुस्त्या करावयाच्या होत्या़ परंतू वाहनाअभावी शहादा, नवापुर, नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यात दुरुस्ती पथक फिरुच शकले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून नादुरुस्त हातपंपांची संख्या वाढून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे़ अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही़ पावसाला सुरुवात झाल्यावरही किमान दोन आठवडे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही़ जमिनीतील भूजल खोल गेले असल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील गाव पाड्यांना मोठी टंचाई भेडसावत आहे़या पार्श्वभूमीवर हातपंप मोठा आधार आहेत़ परंतू पथकांना तेथवर पोहोचण्यासाठी वाहने मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत़ यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या पथकांसाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे़याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी़टी़बडगुजर यांना माहिती विचारली असता, त्यांनी सांगितले की, वाहना संदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे़ सध्या काळात पंचायत समित्यांनी भाडे तत्त्वावर वाहनांची व्यवस्था करुन घेतल्यास अडचणी दूर होणार आहेत़ नवीन हातपंप दुरुस्ती वाहन येईपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत़ दरम्यान त्यांच्या या सूचनेनंतरही पंचायत समित्यांमध्ये दुरुस्ती पथकांकडे वाहन प्राप्त झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे नाराजी व्यक्त होत आहे़