शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात वाढणारी गर्दी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन रूग्ण आढळला नाही ही चांगली बाब असली तरीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन रूग्ण आढळला नाही ही चांगली बाब असली तरीही शहरातील काही भागात सकाळी नित्याची होणारी गर्दी ही चिंताजनक आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन मिरासे यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस, आरोग्य व पालिका प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाने दररोज सकाळी आठ ते १२ असा कालावधी निर्धारित केला आहे तर नवीन बाधित रुग्ण आढळत नसल्याने बफर व कंटेनमेंट झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपले उद्योग-व्यवसाय सुरु केले आहे. मात्र ही शिथीलता आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. शहरात नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असून सहा बाधीत रुग्ण उपचार घेत असताना शहरात कोरोना नाही अशा अविभार्वात नागरिक फिरुन गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. विनाकारण फिरणाºयांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी व आर्थिक घडामोडींना चालना मिळावी म्हणून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसोबत जी सुटी दुकाने आहेत त्यांनाही परवानगी दिली. परंतु याचा अर्थ रोज बाहेर पडून काही ना काही खरेदी करावी किंवा गरज नसताना दुसºयाला सोबत म्हणून बाहेर पडून गर्दीत भर घालावी असा नाही. यातून धोका उद्भवू शकतो किंवा तो वाढू शकतो याबाबत चिंतन करण्यात येऊन गर्दी थांबवण्यासाठी नियोजन करण्यात आले. नागरिकांनी शहरातील गर्दी कमी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून दुचाकीस्वार व अन्य नागरिकांनी बाहेर फिरू नये व प्रशासनाबरोबरच स्वत:च्याही आरोग्याला सहकार्य करावे. अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते.सध्या लॉकडाऊनमधून काही मोकळीक देऊन सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात बाजार आठ वाजता सुरू होत नाही. १० वाजेपासून दुकानदार व लोकही गर्दी करू लागतात. त्यामुळे १० ते १२ या वेळेतच गर्दी वाढते. ही गर्दी कमी करण्यासाठी वेळेचे पुनर्नियोजन करण्याची गरज आहे.