शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दहावीची परीक्षा देण्यासाठी आजोबा-आजी गुजरातमधून थेट नवापुरात; या वयात परीक्षा देण्याची गरज का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 15:45 IST

यंदाचे पहिले वर्ष नसून दरवर्षी गुजरात राज्यातील मंडळी दहावी बोर्डाचे पेपर देण्यासाठी नवापूरला येत असतात. 

रमाकांत पाटील -नंदुरबार : शिक्षणासाठी तुमचे वय नाही तर लागते ती जिद्द आणि चिकाटी. गुजरात राज्यातील 38 शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना वेतनवाढ व पेंशन वाढण्यासाठी वयाचा 60,65,70 वयात दहावीचा गुजराती पेपर देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात येऊन परिक्षा देण्याची वेळ आली आहे. यंदाचे पहिले वर्ष नसून दरवर्षी गुजरात राज्यातील मंडळी दहावी बोर्डाचे पेपर देण्यासाठी नवापूरला येत असतात. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने या ठिकाणी दहावीचा पहिला पेपर असून मराठी उर्दू आणि गुजराती तीन माध्यमांची परीक्षा आज घेण्यात आली आहे.

17 नंबरचा फॉर्म भरून 70 वर्षाचे विद्यार्थी गुजराती पेपर देण्यासाठी गुजरातहून महाराष्ट्रातील नवापूर परीक्षा केंद्रावर गुजराती पेपर देत आहे.गुजराती पेपर देण्यासाठी चक्क गुजरात राज्यातून शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक 60,65,70 वयाचे विद्यार्थी परीक्षेला बसले आहे.तुम्ही चकित झाला असेल ना 70 वयातील विद्यार्थी दहावीचा पेपर का देत आहे.

 त्याचं कारण आहे की त्यांना पदोन्नती, वेतनवाढ पेन्शनसाठी     मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या गुजरात राज्यात नोकरी करणारे शिक्षकांना दहावीचा गुजराती विषय हा गुजरात सरकारने सक्तीचा केल्याने 38 परीक्षार्थी शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक पदोन्नतीसाठी वेतन निश्चितीसाठी गुजराती भाषेचा पेपर लिहिण्यासाठी परीक्षा देताना दिसून येत आहे. या वयात दहावीचा पेपर देण्यासाठी त्यांना चक्क गुजरात राज्यातून 100 किलोमीटर अंतरावरून महाराष्ट्र राज्यात परीक्षा देण्यासाठी यावे लागत आहे.सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मराठी माध्यमाचे 281, उर्दू माध्यमाचे 50, गुजराती माध्यमाचे 278 विद्यार्थी परिक्षेत बसले आहेत. यात 38 विद्यार्थी गुजरात राज्यातील आहेत.

नवापूर तालुक्यातील नवापूर चिंचपाडा विसरवाडी खांडबारा पानबारा, वडफळी, निजामपूर सहा केंद्र असून एकूण दहावीला 3 हजार 562 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. मराठी गुजराती उर्दू माध्यमांचा समावेश आहे. दरवर्षी गुजरात राज्यातून विद्यार्थी गुजराती पेपर देण्यासाठी नवापूरला येत असून पास झाल्यानंतर त्यांचा नोकरी मधला वेतन वाढी व पेन्शन वाढीचा अडसर दूर होता. त्यामुळे नवापूर शहरात दहावीचे परीक्षा देण्यासाठी गुजरात राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षक मंडळी येताना दिसून येते. महाराष्ट्र राज्यात मराठी माध्यमाची दहावी बोर्डाची परीक्षा देऊन शिक्षक म्हणून नोकरी करत असलेले शिक्षकांना गुजरात सरकारने गुजराती विषय सक्तीचा केला आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यातूनच गुजराती विषयाचा पेपर देऊन उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच गुजराती विषयाचा पेपर देणे बंधनकारक असल्याने नवापूरला दरवर्षी गुजरात राज्यातील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक येत असतात. गुजराती विषय नसलेले शिक्षकांना वेतनवाढ व पेन्शनसाठी अडचणी येत असल्याने दहावीचा गुजराती पेपर नवापूरला परिक्षा देतात. नवापूरला गुजराती माध्यमची शाळा असल्याने या ठिकाणी त्यांना पेपर देणे सोयीचे होते. अन्यथा एक विषय देण्यासाठी बोर्डात जावे लागते. 

टॅग्स :GujaratगुजरातStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा