शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूकीस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे़ निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे़ निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आल्याने आठ दिवसांपासून त्यांची तारंबळ उडाली होती़ हा निर्णय गुरुवारी शासनाने मागे घेतला असून निवडणूकीत अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे़ नवीन वेळापत्रकानुसार १६ मार्च पर्यंत मुदत वाढली आहे़सहा मार्चपासून जिल्ह्यातील शहादा, तळोदा, धडगाव आणि नवापुर या चार तालुक्यात निवडणूक कार्यक्रमांतर्गत अर्ज भरणाऱ्यांची धावपळ सुरु होती़ यातही शासनाने गेल्यावर्षी घेतलेल्या निर्णयानुसार जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करुन प्रस्तावांचे टोकन घेण्यास नकार दिला होता़ यामुळे इच्छुकांकडून नाराजी व्यक्त होत होती़ यामुळे चारही तालुका मुख्यालयी तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कक्षातही शुकशुकाट होता़ गुरुवारी सायंकाळपर्यंत नवापुर तालुक्यात १०९ तर शहादा तालुक्यात केवळ १० जणांचे अर्ज आले होते़ उर्वरित दोन तालुक्यात कागदपत्रांसाठी धावपळ सुरु होती़ परंतू गुरुवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्रासोबत जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करण्यास मान्यता देत तसे आदेश त्या-त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवले होते़ यातून इच्छुकांना दिलासा मिळाला असून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला़ आयोगाने सुधारीत निवडणूक कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे़यापूर्वी घोषित करण्यात आलेली १३ मार्चपर्यंतच्या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे़