लॉकडाऊनमुळे गुड फ्रायडे ईस्टरची प्रार्थना आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:32 IST2020-04-08T12:32:32+5:302020-04-08T12:32:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळाच ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण गुड फ्रायडे आणि त्यानंतर ईस्टर संडे होणार आहे़ ...

लॉकडाऊनमुळे गुड फ्रायडे ईस्टरची प्रार्थना आॅनलाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊन काळाच ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण गुड फ्रायडे आणि त्यानंतर ईस्टर संडे होणार आहे़ कोरोनासोबत लढण्यासाठी एकत्र येणे टाळत ख्रिस्ती बांधव घरुन आॅनलाईन गुड फ्रायडेची प्रार्थना करणार आहेत़ यासाठी एसए चर्चने युट्यूब चॅनल सुरु केले असून त्यावरुन गेल्या दोन आठवड्यापासून संडे चर्चही सुरु आहे़
जिल्ह्यातील विविध भागात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे़ नाताळसह गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने ख्रिस्ती समाजबांधवांनीही एकत्र न येता घरुनच प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला होता़ यातच १० एप्रिल रोजी होणाऱ्या गुड फ्रायडेसाठीही नियोजन करुन यूट्यूब चॅनल तयार करत सर्व समाजबांधवांना त्यात जोडून घेत रेव्हरंड अनुप वळवी यांच्यासह धर्मगुरु प्रार्थना करणार आहेत़ ईस्टर संडेनिमित्त होणारे चर्चमधील प्रवचनही आॅनलाईन देण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड अनुप वळवी यांनी दिले आहे़
नंदुरबार जिल्ह्यात एसए चर्चचे १३ चर्च आहेत़ नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स ट्रस्ट फ्रँकलिन मेमोरीयल चर्चमधून सध्या सर्व समाजबांधवांना आॅनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यासाठी चर्चच्या कौन्सिलकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे़ कोरोनासोबत लढा देण्यासाठी आॅनलाईन माध्यमातून स्वच्छता पाळणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचनाही वेळोवेळी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़