शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात युवती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेतियापासून नजीक असलेल्या भडगोन, ता.पानसेमल येथील शेतकरी ओंकार झामू चौहान यांच्या शेतातून घरी परतत ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतियापासून नजीक असलेल्या भडगोन, ता.पानसेमल येथील शेतकरी ओंकार झामू चौहान यांच्या शेतातून घरी परतत असताना 17 वर्षीय युवतीवर बिबटय़ाने हल्ला केल्याने ती ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.याबाबत वृत्त असे की, शनिवार, 27 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भडगोन शिवारात निंदणीचे काम करून मजूर घरी         परतत होते. याचवेळी उसाच्या शेतातून आलेल्या बिबटय़ाने संगीता विजय आर्य (17) या युवतीवर मागून झडप घालून तिला घेऊन उसाच्या शेतात पलायन केले. मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. याबाबत वनविभाग व पोलिसांना तात्काळ माहिती दिल्यानंतर पोलीस व वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. उसाच्या शेतात शोध घेतला असता शेताच्या मध्यभागी संगीता ही रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. बिबटय़ाने तेथून पळ काढला होता. या घटनेत संगीताचा मात्र मृत्यू झाला.या घटनेमुळे खेतिया व परिसरातील शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले असून बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. वनविभागातर्फे घटनास्थळाजवळ दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. वनविभागाचे कर्मचारी सतर्क राहून बिबटय़ाचा शोध घेत आहेत. यावेळी सेंधवा वनविभागाचे उपवनसंरक्षक केशवसिंह पट्टा, उपवनमंडळ अधिकारी नोरके, पानसेमल वनपरिक्षेत्र सहायक प्रदीप पवार, खेतिया वनपरिक्षेत्र सहायक भुरूखा, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल              मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर,          नीलेश पाटील, अनिल चौहान,   संतोष आलोने, जितेंद्र मुवेल उपस्थित होते.