शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:06 IST

सुनील सोमवंशी ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघातून दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने चार उमेदवार ...

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघातून दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी मतदारसंघात चौरंगी लढत आहे. सध्या प्रचारात रंगत आली असून रणधुमाळी शिगेला पोहचली आहे.या विधानसभा मतदारसंघात तीन अपक्ष उमेदवारांसह एकूण सहा उमेदवार छाननीअंती निवडणुकीच्या रिंगणात होते. माघारीच्या अंतिम दिवशी मोहन शेवाळे व सचिन कोळी या दोघा अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने  चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात काँग्रेसचे पद्माकर वळवी, भाजपचे राजेश पाडवी, माकपाचे जयसिंग माळी व अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा यांचा समावेश आहे. शहादा- तळोदा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण या किल्ल्याला गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदेसिंग पाडवी यांनी भगदाड पाडून विजय मिळवला होता. अर्थात त्यावेळी युती व आघाडी झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले होते. परंतु तरीही माजी मंत्री असलेल्या पद्माकर वळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी पद्माकर वळवी यांची लढत उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवीशी आहे. मागे तीनवेळा विजयी झालेले पद्माकर वळवी तसेच पोलीस सेवेतील अनुभव आणि स्थानिक स्तरावर सामाजिक काम असलेले राजेश पाडवी अशी ही लढत रंगणार आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळाची साथ घेतल्याने तालुक्यातील काँग्रेसची मोठी शक्ती जी गेल्यावेळी पद्माकर वळवी यांच्या पाठीशी होती ती शक्ती यावेळी राजेश पाडवींच्या पाठीशी राहणार आहे. परिणामी वळवी यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. आघाडीतील    मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरल्याने राजेश पाडवींना बळ मिळाले आहे. तालुक्यात आणि मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा हे देखील मोठय़ा प्रमाणावर मते घेतील असे दिसते. माकपाचे जयसिंग माळी यांचीही उमेदवारी दखल घेण्यासारखी आहे.

लढतीतील चार उमेदवार व त्यांचे पक्ष  पद्माकर वळवी  (काँग्रेस), राजेश पाडवी (भाजप),  जयसिंग माळी  (माकप),  जेलसिंग पावरा ( अपक्ष)

सत्ताधारी भाजपचे प्रचाराचे मुद्दे

तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर व कामाला सुरुवात.शहादा शहर विकास योजनेसाठी भरपूर निधीची उपलब्धता करून देत विकासाला चालना दिल्याचा दावा. शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी मंजुरी मिळवली. शेतक:यांसाठी शेतकरी सन्मान योजना सुरू करून तालुक्यात जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रय}.नर्मदा आणि तापी नदीचे जवळपास 15 टीएमसी पाणी मतदारसंघात आणणार.

विरोधी काँग्रेसचे प्रचाराचे मुद्दे 

कर्जमाफी योजनेपासून शहादा परिसरातील आणि तळोदा तालुक्यातील  अनेक शेतकरी अजूनही वंचित.शहादा एमआयडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित, त्यामुळे औद्योगिकरण थांबले.उपसा सिंचन योजना दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित, निधी मिळूनही कामांना गती नसल्याचा आरोप.मतदारसंघातील अनेक सिंचन प्रकल्प अपूण रहिले आहे. सत्ताधा:यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.रस्त्यांचे प्रश्न निकाली निघत नसल्याचा आरोप.लाभार्थीना योजनांचा लाभ मिळण्याचा अभाव.