शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांमुळे आरोग्यसेवेत गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या हजेरीबाबत चर्चा सुरु झाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या हजेरीबाबत चर्चा सुरु झाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात नियमित हजर करावे मगच बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी चर्चा सुरु असतानाचा याचा लाभ मात्र परप्रांतातून आलेले बोगस ‘बंगाली’ डॉक्टर घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ प्रमाणपत्र आणि वैद्यकीय पद्धती अर्थात पॅथीची कोणतीही माहिती नसताना घातक अशा ‘स्टेरॉईड’च्या बळावर त्यांचा धंदा जोरात सुरु आहे़जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुमारे ३०० उपकेंद्रांमध्ये १ हजारच्या जवळपास आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत़ असे असतानाही जिल्ह्यातील तीन तालुक्यात बंगाली डॉक्टरांची बोगस उपचार पॅथी वेगात सुरु असल्याचे दरवेळी समोर येत आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्याच्या काही भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील असुविधांमुळे नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाºयांना शहरी भागात नाईलाजाने निवास करावा लागत आहे़ यातून वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने रात्री-अपरात्री येणारे रुग्ण तपासणी करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुर्गम भागातील आदिवासी बांधव बोगस डॉक्टरांच्या आश्रयाला जातात़ साधारण ५० रुपयात एक इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णास बरे वाटते म्हणून घरी जाण्याचा सल्ला देणाºया या डॉक्टरांच्या या प्रकारांमुळे काहींचा आजार वाढून मृत्यूलाही सामोरे जावे लागले होते़ यानंतरही जिल्ह्यात त्यांचा वावर कायम असून जिल्हा परिषदेनेही यातून धडा न घेता वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांवर खापर फोडत पदे भरण्याची मागणी केली आहे़विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाºयांची दहाच पदे रिक्त असल्याची माहिती आहे़ यातून सुविधा नसल्याने वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याचे पुढे येऊन तशी कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे ‘गौडबंगाल’ वाढत आहे़ येत्या काळातही हाच प्रकार सुरु राहण्याची शक्यता असली तरी वैद्यकीय अधिकाºयांना निवासासह वाहनांची सुविधा आणि आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांपर्यंत जाणारे रस्ते दिल्यास सगळ्याच समस्या सुटतील असा विश्वास दुर्गम भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे़