शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धशतकी आकड्याने धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा अर्धशतकापर्यंत गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एकाच कुटूंबातील सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा अर्धशतकापर्यंत गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एकाच कुटूंबातील सहा जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. याशिवाय तळोदा येथे मुंबई येथून आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नंदुरबार व हिंगणी येथील दोन जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातूून डिस्चार्ज देण्यात आला आहे.खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मर्यादीत होता. सर्वत्र नंदुरबार पॅटर्नची चर्चा होत असतांना गेल्या चार ते पाच दिवसात ११ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रीय झाली आहे. कोरोनाचा फैलाव आणखी वाढू नये यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.अर्धशतकी आकडा...जिल्ह्यात कोरोनाचा दुप्पटीचा वेग हा किमान १४ ते १८ दिवस होता. नंतर त्याचा कालावधी पुन्हा कमी होऊन १० ते १२ दिवसांवर आला आहे. गेल्या चार दिवसात तब्बल ११ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वच रुग्ण नंदुरबार शहरातील आहेत. त्यात सुरुवातीला आढळलेला मच्छी बाजारातील रुग्ण, पीडब्ल्यूडी वसाहतीतील रुग्ण नंतर त्याच रुग्णाच्या कुटूंबातील सहा जण, राजीवगांधी नगर, गाझी नगरातील तसेच जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी असे ११ रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांच्या संपर्कातील लोकांना निष्पन्न करून त्यांना संस्थात्मक तसेच घरगुती विलगीकरण करण्यात आले आहे. ज्यांच्यात थोडीफार लक्षणे दिसून आली त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.मुंबई रिटर्न महिलेचा मृत्यूमुबंईहून परतलेल्या ७५ वर्षीय महिलेच्या मृत्यूमुळे तळोद्यात एकाच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणेने दखल घेत महिलेच्या ४० वर्षीय मुलासह ११ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.मृत महिला ५ जून रोजी मुंबई येथून परतली होती. तिची आरोग्य तपासणी करण्यात आली होती व तिला होम कॉर्टाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तीन, चार दिवसांपासून त्या महिलेला ताप, खोकला व श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी तिला तळोदा शहरातील तीन खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. परंतू काल शुक्रवारी संध्याकाळी त्या महिलेला त्रास अधिकच वाढला व रात्री दीड वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. महिलेने उपचार घेतलेल्या दवाखान्यात तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी स्वत: जाऊन महिलेला होणाऱ्या त्रासाविषयी माहिती जाणून घेतली.मृत महिलेच्या मुलाची कोरोना तपासणीचा रिपोर्ट नंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत येथून शहरात अथवा तालुक्यात इतर ठिकाणी येणाºया नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आणि कुठलेही लक्षण असतील तर आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वजण एकमेकांशी संपर्क करुन माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नंदुरबार येथील मुंबई रिटर्न कोरोनाग्रस्ताचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. या व्यक्तीच्या संपर्कातील त्यांचे वडिल देखील कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय हिंगणी येथील मुंबई रिटर्न कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील व्यक्तीवरही उपचार सुरू होते. त्यांचा देखील दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने ते देखील कोरोनामुक्त झाले. त्यांनाही जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.