शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी व आष्टे पंपिंग स्टेशनवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत ...

नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी व आष्टे पंपिंग स्टेशनवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपुरवठासारख्या आवश्यक सेवेच्या ठिकाणी नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केली आहे.

नंदुरबार शहराला विरचक धरणातून झराळी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी एक्स्प्रेस फिडरदेखील बसविण्यात आले आहे. पंपिंगसह येथे जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील आहे; परंतु नियमित वीजपुरवठ्याऐवजी या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे पाणी पंपिंगला अडथळा ठरतो. त्याचा परिणाम शहरातील जलकुंभ भरण्यास वेळ लागत आहे. परिणामी, शहरातील त्या त्या भागातील अर्थात झोननुसार पाणीपुरवठासाठी वेळापत्रक विस्कळीत होत आहे.

हीच स्थिती आष्टे पंपिंग स्टेशनची देखील आहे. येथून शहरातील ३० टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणीदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी, शहरातील जलकुंभ भरण्यास वेळ लागत आहे.

वीज कंपनीने पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी केली आहे.