शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरणावर झाले मुक्त चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बदलत्या शैक्षणिक धोरणावर आणि एकुण शैक्षणिक परिस्थितीवर अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या नवव्या द्विवार्षिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बदलत्या शैक्षणिक धोरणावर आणि एकुण शैक्षणिक परिस्थितीवर अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या नवव्या द्विवार्षिक अधिवेशनात चिंतन करण्यात आले. यावेळी विविध आठ ठरावही करण्यात आले.नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या नवव्या द्विवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अ‍ॅड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे अध्यक्ष व माजी आमदार जयवंतराव ठाकरे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, प्रा. डॉ. पीतांबर सरोदे, यशवंत पाटील, भास्करराव पाटील, डॉ. एन.डी .नांद्रे, सुरेखा आडम, मधुकरराव निरफराके, अ‍ॅड. विठ्ठलराव सोनवणे, राजाभाऊ महाजन, प्रा. डॉ. शरद जावडेकर, अजमल खान, रमेश पाटील, विठ्ठलराव गोटे ,हसन भाई देसाई, सुरेश सोनवणे, सयाजीराव अहिराव ,राजकुमार खामकर ,राजेंद्र जाधव, अशोक तांबटकर आदी उपस्थित होते.जि.प.अध्यक्षा सिमा वळवी म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक भौगोलिक भाग हा सामाजिक दृष्ट्या वेगवेगळा आहे. तेथील शिक्षणाच्या समस्यांचा उहापोह होणे अपेक्षीत आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.स्वागताध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी विनाअनुदानित धोरण शासनाने रद्द करावे असे सांगितले. आमदार सुधीर तांबे यांनी शिक्षण हे मानवी परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे जग बदलण्याची क्षमता शिक्षणात आहे समाजातील तळागाळातील व्यक्तीला सक्षम करायचे असेल तर शिक्षण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार ठाकरे यांनी भारतातील प्रत्येक बालकाला विनामूल्य गुणवत्तापूर्ण व समान शिक्षण मिळालेच पाहिजे ते देण्याची घटनादत्त जबाबदारी व कर्तव्य शासनाचे असल्याचे सांगितले.अधिवेशनात आदिवासी मुलांचे शिक्षण या परिसंवादात प्रा.डॉ. युवराज पाटील, प्रा. डॉ. सुनिल केदारे, प्रा. एस. बी. खिल्लारे यांनी सहभाग घेतला अध्यक्षस्थानी राजाभाऊ महाजन होते .तर दुसऱ्या परिसंवादात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ चा आराखडा या परिसंवादात प्रा. डॉ. उमेश शिंदे, एस. एन. पाटील यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शरद जावडेकर होते.सुरुवातीस माणिक चौकातील शहीद स्मारकास अभिवादन करून रॅली काढण्यात आली. अधिवेशनात प्रा. डॉ. एन.डी. नांद्रे यांना समाजनिष्ठ शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात आला.प्रास्ताविक प्रा. डॉ. एन.डी. नांद्रे, सूत्रसंचालन चेतना बिरारीस तर आभार प्रभाकर नांद्रे यांनी मानले.हिंदू राष्ट्र व भांडवलशाहीच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणा?्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ ला नकार.सकल घरेलू उत्पादनाच्या दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा. इंग्रजी माध्यम करण्याऐवजी इंग्रजी चांगले शिकवा.आदिवासी घटकांसाठीचा निधी पुरेपूर वापरावा. आदिवासी भागातील शाळांसाठी २००४ अनुदान धोरण स्वीकारावे.अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे नाव बदलून 'अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभा' असे करावे.कृती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची शाखा स्थापन व्हावी आदी ठराव करण्यात आले.