म्हसावद येथील रुग्णाला पुरविले नि:शुल्क रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:28+5:302021-07-11T04:21:28+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवार आणि व्हीएसजीजीएम परिवारद्वारा कोरोना महामारीमुळे पडलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नंदुरबारसह ...

Free blood supplied to the patient at Mhaswad | म्हसावद येथील रुग्णाला पुरविले नि:शुल्क रक्त

म्हसावद येथील रुग्णाला पुरविले नि:शुल्क रक्त

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवार आणि व्हीएसजीजीएम परिवारद्वारा कोरोना महामारीमुळे पडलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात रक्तसंकलन अभियान सुरू आहे. गरजूंपर्यंत ही मदत वेळेत पोहोचवून रूग्णांचे आरोग्य जपले जावे हाच यामागचा उद्देश आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आज शहादा तालुक्यात आला. एका रुग्णाला वेळेत रक्त बॅग मिळाली आणि वेळेत उपचार मिळाले. म्हसावद, ता. शहादा येथील भावनाबाई कैलास पाटील यांची शस्रक्रिया होती. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शस्रक्रियेच्यावेळी अचानक रुग्णाला रक्ताची गरज भासली म्हणून नवजीवन रक्तपेढीचे डॉ. सुनील चौधरी व व्हीसजीजीएमचे सदस्य चंद्रकांत पटेल (हिंगणी) यांना गुजर खर्दे, ता. शिरपूर येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करणारे रक्तदाते अमोल अशोक गुजर यांचा फोन आला. या रुग्णाला लागणारी एक रक्तबॅग त्यांनी सायंकाळी विकत घेतली पण अजून रक्त पाहिजे होते. रात्रीच्यावेळी सर्व ब्लड बँक बंद होत्या म्हणून त्यांनी डॉ. सुनील चौधरी यांना संपर्क केला. डॉ.सुनील चौधरी व चंद्रकांत पटेल यांनी समन्वय साधत तत्काळ एक रक्त बॅग नि:शुल्क उपलब्ध करुन देत भावना पाटील यांना वेळेवर मदत पोहोचवत ‘लोकमत नातं रक्ताचं’ या अभियानाला बळ दिले.

Web Title: Free blood supplied to the patient at Mhaswad