शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

चार वरिष्ठ पदे प्रभारींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन वरिष्ठ तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु त्यांच्या जागी अद्याप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन वरिष्ठ तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झाली नाही. दोन उपविभागीय अधिकाऱ्यांचा पदभार हा पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाºयांकडे सोपवावा लागला आहे. दोन राज्यांच्या सिमेवरील जिल्हा असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तातडीने वरिष्ठ अधिकाºयांची रिक्त पदे भरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या आठवड्यात अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अक्कलकुवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि मुख्यालयातील गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड यांच्या बदल्या झाल्या आहेत. याशिवाय महिनाभरापूर्वी नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार हे महिनाभरापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत.नंदुरबार पोलीस दलाची रचना पहाता जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्या त्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व त्याअंतर्गत येणारे दूरक्षेत्र अशी रचना आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात दोन अपर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी व एक पोलीस उपअधीक्षक यांची पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या वेळी या जागांवर कुणाही अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर अधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.जिल्हा दोन राज्यांच्या सिमेवर असल्याने आणि दोन प्रमुख महामार्ग गेलेले असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा नेहमीच सवेंदनशील राहिला आहे. नंदुरबार व शहादा शहरात तर नेहमीच अलर्ट राहावे लागते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरील चार पदे रिक्त राहणे म्हणजे मोठी कसरतच आहे. सद्य स्थितीत पोलीस अधीक्षक व एक उपविभागीय पोलीस अधिकारी वगळता एकही वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे ऐनवेळी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास पोलीस दलाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने बदली आणि सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अधिकाºयांची नेमणूक करावी अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून आणि पोलीस दलाकडून देखील व्यक्त होत आहे.