शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यातील चौघे क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील एकाचा अहवाल सुरत येथे पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील एकाचा अहवाल सुरत येथे पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ दरम्यान प्रशासनाने चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून दिल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांनी दिली आहे़
अक्कलकुवा शहरात गेल्या आठवड्यात एका राष्ट्रीयकृत बँकेतील दोन अधिकारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता़ त्यांच्यावर उपचार पूर्ण होवून ते बरे झाले आहेत़ दरम्यान शहरातील हवालदार फळी येथील एक रुग्ण सुरत येथे १२ जुलै कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे़ प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णाची चौकशी करुन संपर्कात आलेल्या चौघांना खापर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे़ कोरोनाबाधित रुग्णाचे घरही सील करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़ कोरोनाचे निदान होण्यापूर्वी बाधित रुग्णाने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता़ हे रुग्णालयही आरोग्य विभागाने सील केले आहे़ नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत़ अक्कलकुवा शहरात अनेक जण बेजबाबदारपणे वागत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे़ सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत आहे़
शहर व तालुक्यात बाधित रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे़ घराबाहेर पडताना मास्क लावावे व सोशल डिस्टन्सिंग करावे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांनी कळवले आहे़