शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील घरे उजळवणाऱ्या ‘रॉकेल’ची चार महिन्यांपासून प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात विजेच्या तुटवड्यामुळे आदिवासी बांधवांची घरे प्रकाशमान करण्यास सहाय्यकारी ठरणारे रॉकेल चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागात विजेच्या तुटवड्यामुळे आदिवासी बांधवांची घरे प्रकाशमान करण्यास सहाय्यकारी ठरणारे रॉकेल चार महिन्यांपासून मिळालेले नसल्याची स्थिती आहे़ मोलगी व परिसरातील ४० गाव पाड्यांवरच्या लाभार्थींना रॉकेलच मिळाले नसल्याने त्याची तातडीने तरतूद करण्याची मागणी आहे़अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागात मोलगी परिसरातील ४० गावांमध्ये गेल्या एक वर्षांपासून विजेचा तुटवडा आहे़ २४ तासा किमान तीन तास वीज पुरवठा होत असल्याचा प्रकार सध्या येथे होत आहे़ रात्रीच्यावेळीही वीज पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अंधारात कंदील, दिवे, चिमण्या किंवा बत्त्या पेटवण्याची वेळ येते़ यासाठी रॉकेल हे सर्वाधिक सहाय्यकारी ठरते़ परंतू गत चार महिन्यांपासून येथे रॉकेलच मिळत नसल्याचे प्रकार समोर आला आहे़ याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे़ निवेदनात मोलगी परिसरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वीज समस्येवर तसेच रॉकेलच्या टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे़ हे निवेदन भगवान ढोले, मंगलसिंग अहिरे, रामसिंग परमार, फुलसिंग रहासे, दिनकर पाडवी, देवीदास बागुल, प्रकाशचंद सोलंकी, राजू पिंजारी, चंद्रसिंग वसावे, कोचºया वसावे, कृष्णा वसावे, सुनिल पाडवी, गणेश वळवी, खेमचंद वसावे, पंकज जैन, महावीर टाक, मोतीराम चौधरी, अनिल माळी, बुधा महाले, इश्ताक सय्यद, विनोद ढोले यांनी दिले आहे़रॉकेल टंचाईबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे़ रॉकेलच्या टंचाईमुळे गाव-पाड्यात अंधारात चाचपडणाºया आदिवासी बांधवांना सर्वाधिक धोका हा विषारी सर्पांचा आहे़ रात्री अपरात्री घरात घुसणाºया अनर्थ होण्याची भिती आहे़ विजेचा प्रश्न निकाली निघावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे़ त्यातून मग सहाय्यकारी ठरणाºया जीवनावश्यक वस्तूंचा ठोसपणे पुरवठा करावा अशी मागणी आहे़