शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फळझाडांद्वारे वन समित्या देणार ‘युवकांना रोजगार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील युवकांना वनउपजद्वारे रोजगार देण्याचा प्रयत्न वनविभागाने सुरु केला असून यासाठी ंसंयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील युवकांना वनउपजद्वारे रोजगार देण्याचा प्रयत्न वनविभागाने सुरु केला असून यासाठी ंसंयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे सहाय्य घेतले जात आह़े यांतर्गत प्राथमिक स्तरावर आठ गावांमध्ये फळझाडांची लागवड केली गेली असून तीन वर्षानंतर येणा:या उत्पादनाची विक्री होणार आह़े  वनविभागाने तोरणमाळ वनक्षेत्र हद्दीतील आठ गावांमध्ये प्रत्येकी 25 हेक्टर याप्रमाणे 200 हेक्टर जमिन यंदा फळबाग लागवडीसाठी देण्याचे नियोजन केले होत़े तीन वर्षानंतर उत्पादनक्षम होणा:या या झाडांवरुन मिळणारी फळे ही त्या-त्या गावातील युवकांना देत त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्याची योजना आखली गेली आह़े 10 जुलै रोजी या योजनेस प्रारंभ झाला असून यात आता स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समित्या या झाडांची आयुष्यभर निगा राखून गावातील युवकांना फळे उपलब्ध करुन देणार आहेत़ या फळांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न रोजगाराभिमुख युवकांसह समितीला देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने झाडांचे संगोपन संवर्धन सुरु झाले आह़े या उपक्रमाची उपवनसंरक्षक एस़बी़केवटे यांनी नुकतीच पाहणी केली होती़ यावेळी त्यांच्यासोबत सहायक वनसंरक्षक आऱएस़झगडे होत़े या झांडांच्या संवर्धनासाठी सूचना करत त्यांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिका:यांसोबत चर्चा केली़ लागवड करण्यात आलेल्या झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात येऊन त्यांच्या वाढीची माहिती प्रशासन उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगण्यात आले आह़े झाडांच्या संगोपन संवर्धनासाठी वनविभाग वेळावेळी समित्यांसोबत बैठका घेऊन चर्चा करणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आह़े 

तोरणमाळ राखीव संवर्धन योजनेंतर्गत सुरु झालेल्या या उपक्रमासाठी राणीपूर, नागङिारी, तोरणमाळ, कोटबांधणी, मुरुमापाडा आणि गोरंबा या आठ गावांची निवड करण्यात आली आह़े प्रत्येक गावातील 25 हेक्टर क्षेत्रात 10  हजाराच्या जवळपास झाडे लावण्यात आली आहेत़ यात प्रामुख्याने आंबा, मोह, चारोळी, आवळा, चिंच, सिताफळ, पेरु, जांभळे या झाडांचा समावेश आह़े मध्यम उंचीची झाडे लावली गेल्याने त्यांच्यातून तीन वर्षात उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े एकूण 24 हजार हेक्टर पूर्ण क्षेत्र असलेल्या तोरणमाळ वनक्षेत्रातील 200 हेक्टरच्या या उपक्रमाचा पुढेही विस्तार होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

उपक्रमांतर्गत काही दिवसांपूर्वी आठही गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेत वनविभागाने घेतली होती़ यात गावालगत निर्धारित केलेल्या 25 हेक्टर फळझाड लागवड वनक्षेत्रात गुरेचराई बंदीसह कु:हाडबंदीचा नियमही लागू करण्यात आला़ या झाडांच्या वाढीबाबत वेळावेळी विभागाला माहिती देण्यासह उत्पादनाचे नियोजन कसे करावे यावरही चर्चा करण्यात येऊन उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले होत़े