शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महाराष्ट्र दिन साजार करण्यात आला.पालकमंत्री पाडवी यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट परतावून लावण्यासाठी नागरिकांना एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, सर्वांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही अ‍ॅड.पाडवी यांनी केले. ते म्हणाले, कोरोना विषाणुच्या संसर्गाबाबत जनतेत जागृती झाली आहे. प्रशासनाने ही समस्या उत्तमरितीने हाताळली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे.जिल्ह्यात पाच व्हेंटीलेटर्स असून, आणखी १० व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत. डायलिसीस यंत्र खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. बाहेरील राज्यात असलेल्या जिल्ह्यातील शेतमजुरांना आणण्याची कार्यवाही सुरू असून, त्यांची वैद्यकीय तपसणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि मजुरांची यादी घेण्यात येत असून, त्यांना आणण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.प्रतिबंधीत क्षेत्रात नियमांचे कडकपणे पालन करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे ९५ टक्केपेक्षा जास्त वाटप करण्यात आले असून, केंद्र सरकारद्वारा प्राप्त तांदूळाचेदेखील ८५ टक्के वाटप करण्यात आले आहे. रेशन दुकानदारांनी अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्याच्या भूमीकेतून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात येत असून, आतापर्यंत १३ हजार मजूर कामावर असल्याची माहिती त्यांनी दिली.