शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार शहरातील पाच तर मोलगीत एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पाच तर मोलगी ता़ अक्कलकुवा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सलग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील पाच तर मोलगी ता़ अक्कलकुवा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ सलग दुसऱ्या दिवशी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे़धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा रिपोर्ट मंगळवारी प्रशासनाला प्राप्त झाला़ यात नंदुरबार शहरातील गिरीविहार परिसरातील ५६ वर्षीय पुरुष, मंगळ बाजार परिसरातील सिद्धीविनायक चौक परिसरातील ७७ वर्षीय महिला, धर्मशांती नगरातील ३६ आणि ३४ वर्षीय पुरुष व ९ वर्षीय बालक यांना कोरोनाची लागण झाली आहे़ दरम्यान मोलगी येथील २७ वर्षीय पोलीस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातील धर्मशांती नगरातील तिघे आधीच जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याची माहिती देण्यात आली आह़े तर गिरीविहार येथील ५६ वर्षीय पुरुषाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ मोलगी येथील रुग्ण येथील रुग्णही आयसोलेश वॉर्डात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान गिरीविहार येथील ५६ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ धर्मशांती नगरातील तिघे रुग्ण हे सिंधी कॉलनीतील दोघींच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले आहे़ तर सिद्धीविनायक चौकातील वृद्धेच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़

मंगळ बाजार परिसरातील सिद्धीविनायक चौकातील ७७ वर्षीय बाधित महिलेच्या संपर्कातील एक व्यक्ती जिल्हा परिषदेत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले असून संबधितांना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़ धर्मशांतील नगरातील तिघांच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे़ सिंधी कॉलनी व परिसरात रुग्ण आढळून आल्यानंतर पालिकेकडून फवारणीला वेग देण्यात आला आहे़

मोलगीतील पोलीस कर्मचारी बाधितदरम्यान मोलगी येथील एक रुग्ण डिस्चार्ज झाल्याची कारवाई होत असताना तेथीलच दुसऱ्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मोलगी येथील नव्याने बाधित २७ वर्षीय कोरोना रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून बाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला खापर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते़ त्याचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मोलगी येथील पत्नी आणि मुलगी यांनी खापर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आणले जात आहे़ बाधित पोलीस कर्मचाºयाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे़