तळोदा येथे स्पेअर पार्ट दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:49+5:302021-02-12T04:29:49+5:30

कोठार : तळोदा येथील ऑटो पार्ट्स दुकानाला आग लागल्याची घटना घडली. यात लाखोंचे नुकसान झाले असून अग्नी उपद्रव अंतर्गत ...

Fire at spare part shop at Taloda, loss of lakhs | तळोदा येथे स्पेअर पार्ट दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

तळोदा येथे स्पेअर पार्ट दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

कोठार : तळोदा येथील ऑटो पार्ट्स दुकानाला आग लागल्याची घटना घडली. यात लाखोंचे नुकसान झाले असून अग्नी उपद्रव अंतर्गत नोंद करण्यात आला आहे.

धवळीविहीर येथील योगेश विजयसिंग पावरा यांचे अक्कलकुवा तळोदा बायपास रोडवर बालाजी पेट्रोल पंपासमोर आप की जय ऑटो पार्ट‌्स व मोटारसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. दुकानाला बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात कारणावरून अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत दुकानात असणाऱ्या दुरुस्तीसाठी आलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा सहा मोटारसायकली व मोटारसायकल स्पेअर पार्ट तसेच काँप्रेसर मशीन आदी साहित्य आगीत जळून खाक झाले.

योगेश पावरा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात अग्री उपद्रव अंतर्गत या घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नाईक हे करीत आहेत.

दरम्यान, धवळीविहीर येथिल योगेश पावरा या युवकाने काही महिन्यांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचा मोटारसायकल दुरुस्ती व स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. आता कुठे त्याचा या व्यवसायात चांगला जम बसत होता. मात्र दुकानाला लागलेल्या या आगीमुळे लाखोचे नुकसान झाल्याने योगेश पावरा यांचे स्वप्नदेखील जळून राख झाली आहेत. त्यांच्यावर बेरोजगारीची संक्रांत कोसळली आहे.

Web Title: Fire at spare part shop at Taloda, loss of lakhs