विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्याला साडेतीन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:40+5:302021-07-07T04:37:40+5:30

सविस्तर असे की, गुजरातमधील भमसाळ येथून डंपरमध्ये (क्रमांक एम.एच.२० इ.जी.६६२२) क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून येवलाकडे जात होता. हे ...

A fine of Rs 3.5 lakh for transporting unlicensed sand | विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्याला साडेतीन लाखांचा दंड

विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्याला साडेतीन लाखांचा दंड

सविस्तर असे की, गुजरातमधील भमसाळ येथून डंपरमध्ये (क्रमांक एम.एच.२० इ.जी.६६२२) क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून येवलाकडे जात होता. हे डंपर महसूल विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. प्रकाशाचे मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, डामरखेडा येथील तलाठी योगेश देसले व लांबोळा येथील तलाठी पंकज पवार यांनी हे वाळूने भरलेले डंपर पकडले. त्यात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १५ टन जास्त अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने वाहनाचे वजन केले असता जास्तीची वाळू आढळून आल्याने शहादा तहसील कार्यालयाच्या आवारात डंपर जमा करण्यात आले होते. नियमबाह्य वाळू वाहतूक केल्यामुळे शहाद्याचे तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दंडात्मक कारवाई केली. या डंपर मालकावर साडेतीन लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येऊन दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

Web Title: A fine of Rs 3.5 lakh for transporting unlicensed sand