शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची परवड : लहान शहादे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:42 PM

लोकमत ऑनलाईनलहान शहादे, दि़ 22 : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांची परवड सुरू आह़े आरोग्य केंद्रात नियुक्तीस असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े शिंदे, खोडसगाव तसेच परिसरातील 10 गावांच्या ग्रामस्थांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन वावर ...

लोकमत ऑनलाईनलहान शहादे, दि़ 22 : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांची परवड सुरू आह़े आरोग्य केंद्रात नियुक्तीस असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े शिंदे, खोडसगाव तसेच परिसरातील 10 गावांच्या ग्रामस्थांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन वावर असतो़ साथीच्या आजारांसह गर्भवती माता आणि लहान बालक याठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात़ मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर येतच नसल्याने रूग्णांचे हाल होत आह़े नंदुरबार- प्रकाशा रस्त्यावरील या आरोग्य केंद्रात आजघडीस नियुक्तीस असलेले डॉक्टर व इतर कर्मचारी नंदुरबार शहरात राहतात़ नंदुरबार येथून लहान शहाद्यार्पयत 20 मिनीटांपेक्षा कमी वेळ लागत असतानाही येथे दुपारी 2 वाजेनंतरच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा:यांचे आगमन होत़े तोवर त्यांची वाट बघत रूग्ण आवारात बसून असतात़ रूग्णांची सुरू असलेली हेळसांड थांबावी म्हणन ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही सुधारणा झालेली नाही़ जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रूग्ण आणि त्यांच्या तक्रारींची दखलही घेतलेली नसल्याने येथे येणारे रूग्ण कंटाळून नंदुरबार शहरात जावून खाजगी डॉक्टरकडून उपचार करून घेत आहेत़ आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने परिसरातील डॉक्टरांकडे जावून नागरिक उपचार घेत आहेत़ हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आह़ेसध्या या परिसरात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आह़े त्याठिकाणी विविध दुखापती होणारे मजूरही आरोग्य केंद्रात येतात़ त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने तेही नंदुरबारचा रस्ता धरतात़ गेल्या वर्षात आरोग्य केंद्रात शिबिरांचे तसेच संततीनियमन शस्त्रक्रियांची शिबिरे भरवण्यात आलेली नाहीत़ यामुळे गोरगरीबांना खाजगी रूग्णालयात या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत़