सारंगखेड्यातील घोडे बाजारात पावणे दोन कोटींचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:20 IST2019-12-17T12:20:27+5:302019-12-17T12:20:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे भरलेल्या घोडे बाजाराने सोमवारी पावणे दोन कोटींचा टप्पा पार केला. ...

 Finding horses in Sarangkheda crosses the two-crore mark | सारंगखेड्यातील घोडे बाजारात पावणे दोन कोटींचा टप्पा पार

सारंगखेड्यातील घोडे बाजारात पावणे दोन कोटींचा टप्पा पार

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे भरलेल्या घोडे बाजाराने सोमवारी पावणे दोन कोटींचा टप्पा पार केला. या घोडेबाजारात विक्रीसाठी आलेला एक कोटी रुपये किमतीचा ‘रफ्तार’ घोडा आकर्षण ठरले आहे.
येथील घोडेबाजारात सोमवारी ८० घोड्यांची विक्री झाली. यातून ३० लाख सहा हजार रुपयांची उलाढाल झाली. आजअखेर तीन हजार घोड्यांची आवक झाली असून त्यातून ४७२ घोड्यांची विक्री झाली आहे. यातून एक कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे. अर्थातच सहा दिवसातच घोडेबाजारात पावणे दोन कोटींची उलाढाल झाली आहे. सोमवारी या बाजारात ६०० घोड्यांची आवक वाढली होती. जबलपूर (मध्य प्रदेश) येथून माँटीसिंग यांनी अश्व स्पर्धेसाठी ५० घोडे आणले आहेत. हे घोडेही अश्व शौकीनांसाठी आकर्षण ठरले आहे.
कृषी प्रदर्शनाला भेट
यात्रेत भरलेल्या कृषी प्रदर्शनाला विविध शाळांचे विद्यार्थी भेटी देत आहेत. चोरविहीर, ता.नवापूर येथील टीम ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन नर्सरी, पिके, वाहने, ठिबक सिंचनची माहिती जाणून घेतली.
‘खान्देशी तडका’ची धमाल
यात्रेनिमित्त सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी ‘खान्देशी तडका’ हा कार्यक्रम सादर केला. त्यात वनमाला बागूल यांच्यासह साधना जोशी, पल्लवी पाटील, ज्योती बोराडे, सोनल शिंदे या मुंबई येथील कलावंतांनी कार्यक्रम सादर केला.

Web Title:  Finding horses in Sarangkheda crosses the two-crore mark