लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मोहिदा शिवारातील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. येथे निर्माण होणारे बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी खासगी कंपनीशी करार करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी अचानक संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहिम राबविली गेल्याने येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांनी आश्चर्य व्यक्त केले.
कोरोना विषाणू बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकृत करण्यासह सौम्य लक्षण असलेल्या बाधितांवर उपचारासाठी मोहिदा शिवारातील शासकीय वसतिगृहाच्या चार इमारतींमध्ये कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे १०० पेक्षा अधिक नागरिक येथे आहेत. या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांनी नाराजी व्यक्त केली होती तर वैद्यकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी असलेले पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी ते सार्वजनिक ठिकाणी फेकण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरासह आजूबाजूच्या परिसरात कोरोनाविषाणू संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता.
या कोविड सेंटरच्या दुरवस्थेबाबत ‘दैनिक लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून येथील रूग्णांच्या व्यथा मांडल्या व त्यावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शुक्रवारी सकाळपासूनच संपूर्ण परिसरात स्वच्छता कर्मचाºयांमार्फत साफसफाई करण्यात आली. ठिकठिकाणी साचलेले पाणी व घाणीचे ढिगारे उचलण्यात येऊन चारही इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे येथे निर्माण होणारे मेडिकल बायो वेस्टची शास्त्रीय पद्धतीने योग्य विल्हेवाट लावण्यासाठी धुळे येथील एका खासगी संस्थेशी करारनामा करण्यात आला आहे. दररोज हे मेडिकल बायो वेस्ट संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे बंधन या कंपनीवर घालण्यात आलेले आहे.
परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची असली तरी बाधित रूग्ण उपचार घेत असलेल्या रूमची स्वच्छता करण्यासह तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये यासाठी रूग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निर्माण होणारा दैनंदिन कचरा एका ठिकाणी संकलित करून तो पिशवीत बांधून रूम बाहेर ठेवावा. त्याचप्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
अखेर जैविक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:39 IST
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मोहिदा शिवारातील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. येथे निर्माण होणारे ...
अखेर जैविक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}