शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ सहा पोलीस ठाण्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ काही ठिकाणी मास्कविना फिरणारे तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अभाव दिसून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़शहादाशहादा पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी मुनेश बापूजी जगदेव रा़ सिद्धार्थ नगर जळगाव हा शनिवारी मास्कविना आढळून आल्याने पोलींसानी कारवाई केली़ पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़सारंगखेडासारंगखेडा पोलीस ठाण्यांतर्गत वडाळी येथे रविवारी सायंकाळी अशोक दिलीप धनगर मास्कविना फिरत होता़ याठिकाणीच शनिवारी हारुन रज्जाक खाटीक व तौसिफ जमील शहा यांच्यावर मास्कविना फिरल्याने कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी तिघांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद राठोड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़धडगावजुने धडगाव परिसरात मास्कविना फिरणाºया राजेंद्र विजय पावरा रा़ शेलकुवीचा नावडक्यापाडा ता़ धडगाव याच्यावर पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला़ पोलीस शिपाई विनोद पाटील यांनी फिर्याद दिली आहे़दरम्यान शनिवारी धडगाव शहरात राजेंद्र रेहला वळवी व भूपेश गुलाबसिंग ठाकरे यांच्याविरोधात मास्क न लावता फिरल्याने गुन्हे दाखल आहेत़नंदुरबार तालुकानंदुरबार तालुक्यातील चौपाळे गावाजवळ शनिवारी सुदाम वेडू कुमावत हा मास्कविना फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी कारवाई केली़ रविवारी जुनमोहिदे गावात मास्कविना फिरणाºया रमेश युवराज घोडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली़ दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे़नंदुरबार उपनगरउपनगर पोलीस ठाण्यांतर्गत नंदुरबार शहरातील बाबा गरीबदास चौकात मास्कविना फिरणारा प्रतिक राजकुमार मंदाणा व विरु श्रीचंद दावणी या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली़ दोघे मास्कसोबत सोशल डिस्टन्सिंग करुन माल विक्री करत नसल्याचे दिसून आल्यानंतर दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले़विसरवाडीविसरवाडी ता़ नवापुर येथील साबेर सुलेमानभाई बंगलावाला भाणा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मास्कविना फिरत होता़ त्याच्यावर कारवाई करण्यात आली़शहरातील अहिंसा चौकातील सुंदरी ट्रेडर्सवर सोशल डिस्टन्सिंग नसल्याने अतुल युवराज अग्रवाल, कल्याणी पार्कमध्ये अविनाश मंगा पाटील व सी़बी़पेट्रोलपंपासमोर दुकानदार जयपालभाई नवतनदास बालाणी यांच्याविरोधात पोलीसांनी कारवाई केली़ सोशल डिस्टन्सिंग न ठेवता त्यांच्याकडून ग्राहकी सुरु होती़ उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नंदुबार शहर, तालुका आणि उपनगर पोलीस ठाणेंतर्गत दररोज सकाळी पथके दुकानांचा आढावा घेत आहेत़