शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

ब्राह्मणपुरी : कर्ज थकविणाऱ्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. ही थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे; परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या ...

ब्राह्मणपुरी : कर्ज थकविणाऱ्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. ही थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे; परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम सरकार देणार होते; परंतु त्याबाबत केवळ घोषणाच असल्याने प्रत्यक्षात कृती होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता थकबाकीदार व्हावे का? अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.

शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली बाब आहे. मात्र, याचवेळी जे नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. केवळ मधूनमधून घोषणा करीत असतात. या घोषणांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये साह्य केले जाईल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही. त्यामुळे आम्हालाही थकबाकीदार शेतकरी व्हावे लागेल, अशा संतप्त भावना नियमितरीत्या कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी हे श्रीमंत शेतकरी आहेत असा समज शासनाचा आहे काय? नियमित कर्ज फेडणारे शेतकरी केवळ कर्जाची आलटपालट करतात. त्यामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांचा विचार करून अमलात आणाव्यात.

शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन योजना चालू केली होती; परंतु प्रोत्साहन योजना ही फसवी योजना ठरत आहे. म्हणून शेतकरी वर्ग पैसे भरण्यासाठी विचार करीत आहे.

- सुभाष तुकाराम पाटील, शेतकरी, गोगापूर, ता.शहादा.

सद्य:स्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी गेलो असता शेतकरी म्हणतात की, प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान आमच्या खात्यावर जमा करावे व बाकी पीककर्ज रक्कम आम्ही भरण्यास तयार आहोत. शासनाकडून ५० हजार रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणजे नियमित वसुलीसाठी अडचणी येणार नाहीत.

-जयदेव पाटील, चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, गोगापूर, ता. शहादा.