शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डाॅक्टरांमुळे संसर्गाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

विलगीकरणही बंदच नंदुरबार : जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली असल्याने दिलासा मिळत आहे. यातून ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले विलगीकरण कक्षही ...

विलगीकरणही बंदच

नंदुरबार : जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली असल्याने दिलासा मिळत आहे. यातून ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले विलगीकरण कक्षही रिकामे आहे. दक्षता म्हणून यातील काही कक्ष सुरू असून त्याठिकाणी माध्यमिक व प्राथमिक शाळांचे शिक्षक दिवसभर थांबत आहेत. हे कक्षही लवकरच बंद होणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाने लक्ष द्यावे

नंदुरबार : तालुक्यातील काही भागात जीवनावश्यक वस्तूंचे दर अचानक वाढीस लागल्याच्या तक्रारी अद्यापही होत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. खाद्यतेल, डाळी यासह इतर पदार्थांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. ही दरवाढ नेमकी कोणाच्या आदेशाने केली हे किराणा दुकानदार सांगत नाहीत. यातून गोरगरिबांची पिळवणूक होत असल्याची माहिती आहे.

चारा वाहतूक वाढली

नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा व शहादा तालुक्यातून कोरडा आणि हिरवा चारा खरेदी करुन नागरिक नेत आहेत. नंदुरबार तालुक्यात यंदाही चारा टंचाई आहे. पशुपालकांकडे जूनपर्यंतचा चारा असल्याने त्यांच्याकडून चारा खरेदी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डिस्टन्सिंगची गरज

तळोदा : शहरातील विविध भागात भाजीपाला विक्रेते व्यवसाय करू लागले आहेत. कोविड नियमांनुसार त्यांची बैठक व्यवस्था असली तरी काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याचे दिसून आले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देत व्यावसाियकांना माहिती देणे गरजेचे आहे.

विसरवाडी येथे केंद्र सुरू करावे

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रॅपिड ॲन्टिजन चाचणी व स्वॅब संकलन केंद्र नियमित सुरू करावे अशी मागणी आहे. या नियमित केंद्रामुळे विसरवाडी परिसरातील ४० खेड्यापाड्यातील नागरिकांची सोय होणार आहे. नागरिकांना रॅपिड टेस्टसाठी सध्या पथकाची वाट बघावी लागत आहे. रॅपिड टेस्टसाठी नागरिकांना नंदुरबार किंवा नवापूर येथे जावे लागत आहे.

टाॅवर सुरू करावा

मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागातील मोलगी ता. अक्कलकुवा परिसरातील मोबाईल टाॅवर बंद आहेत. ते तडीने सुरु करण्याची मागणी आहे. लाॅकडाऊनमुळे सध्या इंटरनेटचा वापर वाढला आहे. परंतु टाॅवर बंद असल्याने नागरिकांना माहिती मिळण्यास अडचणी येत आहेत.

जनजागृतीला प्रतिसाद

धडगाव : तालुक्यातील विविध भागात लसीकरणात वाढ व्हावी यासाठी जनजागृती सुरु करण्यात आली आहे. या जनजागृतीमुळे लसीकरण वाढत असून मास्कचा वापरही नागरिक करु लागले आहेत. गेल्या काही काळात मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई व दंड झाल्याने नागरिक दक्षता घेत आहेत.

शेतीकामांना गती

शनिमांडळ : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील शनिमांडळ परिसरातील गावांमध्ये शेतीकामे सुरु आहेत. खरीपपूर्व पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करत आहेत. या भागात अनेकांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. यातून मजुरांना रोजगार मिळत आहे.

लसीकरण शिबिर

शहादा : तालुक्यातील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध गावांमध्ये लसीकरण शिबिरे घेण्यात येत आहेत. मोहिमेसाठी डॉ.बी.डी.निकुंभ यांच्या आरोग्य केंद्राचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. वाघर्डे परिसरातील गावांमध्ये ग्रामपंचायतींकडून जनजागृती करुन लसीकरणावर भर दिला जात आहे.