शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

लागण होण्याच्या भितीनेच कोविड केअर सेंटर्समध्ये दिसतोय शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

नंदुरबार : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरु केलेल्या कोविड सेंटर्सच्या बाहेर रुग्णांचे नातलगतही फिरकत नसल्याने या सेंटर्सवर शुकशुकाट आहे. ...

नंदुरबार : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरु केलेल्या कोविड सेंटर्सच्या बाहेर रुग्णांचे नातलगतही फिरकत नसल्याने या सेंटर्सवर शुकशुकाट आहे. कोरोनाची लागण होण्याची भिती असल्याने या इमारतींच्या आवारातही कोणी फिरकत नसल्याचे दिसून आले.

शहरातील जिल्हा रुग्णालय आवारात असलेले महिला रुग्णालय आणि आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल अशा दोन ठिकाणी सध्या कोविड केअर सेंटर सुरु आहेत. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना एकलव्य येथे ठेवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शाळा सुरु होणार असल्याने हे सेंटर बंद करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ते पुन्हा सुरु करण्यात आले आहे. दरम्यान महिला रुग्णालयात दाखल रुग्ण बाहेर पडू नये तसे आतील भागात कोणी जावू नये यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक व जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून आले आहे. एकलव्य स्कूलची इमारतच शहराबाहेर असल्याने या भागात आरोग्य कर्मचारीच दिसून येत आहेत. याठिकाणी सध्या नव्याने तयारी सुरु आहे. दरम्यान विमल विहार परिसरात असलेल्या तापी कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ९ रुग्ण उपचार घेत असून त्यांनाही डिस्चार्ज करण्यात येणार असल्याने या इमारतीतही शुकशुकाट दिसून आला.

तरीही गेटवर सुरक्षा रक्षक दिसेनात

खामगाव रोडवर आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य रेसीडेन्शियल स्कूलची इमारत आहे. याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. २७० बेड्सची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. यापूर्वी दाखल रुग्णांनी सुविधेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर याठिकाणी चोख व्यवस्था देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतील सुविधा ह्या चांगल्या प्रकारे सुरु झाल्या असल्या तरी सुरक्षा रक्षक मात्र दिसून आले नाही. याठिकाणाहून रुग्ण बाहेर जाणे सहज शक्य असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपायायोजनांची गरज आहे.

पोलीस कर्मचारी असतात तैनात

जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयामागे महिला रुग्णायात एकूण १०० खाटा आहेत. याठिकाणी सध्या रुग्ण ठेवण्यात आले आहेत. समोरील बाजूस नेत्रकक्षात ४० खाटांचे आयसीयू आहे. परंतू या परिसरात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याबाबत उदासिनता आहे. सहसा कोरोनाच्या भितीने कोणी तिकडे जात नसले तरीही रुग्णांचे नातेवाईक फिरत असल्याचे दिसून आले. महिला रुग्णालयातही बरेच रुग्ण बाहेरील बाजूस येत असल्याचे दिसून येत होते.